असं म्हणतात जसा देवाचा जीव भक्तांवर असतो, तसाच कलाकारांचा जीव ते काम करत असलेल्या रंगभूमी आणि कर्मभूमीवर असतो. मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले असेच जेष्ठ आणि प्रसिद्ध कलाकार होते दादा कोंडके. दादांची नाळ सर्वात प्रथम जोडली गेली ती म्हणजे नाटकांशी. दादांनी “विच्छा माझी पुरी करा” या नाटकात काम केले.दादा प्रसिद्धी झोतात आले ते या नाटकामुळेच. या रंगभूमीवर काम करत असताना बरेच जण व्यसनाधीन होतात. परंतु दादांना रंगभूमीवर व्यसन करून आलेली व्यक्ती अजिबात आवडत न्हवती. डॉ काशिनाथ घाणेकर हे नाट्यसृष्टीतील मोठे प्रस्थ म्हणून ओळखलं जायचं. परंतु काशिनाथ घाणेकर यांना असलेल्या व्यसनाच्या सवयीला कंटाळून दादा कोंडके यांनी चांगलाच दम दिला होता. दादा कोंडके यांच्या सहवासात असलेल्या एका व्यक्तीने हा किस्सा लिहिला आहे. (dada kondke got angry)
हे देखील वाचा: ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड
ज्या नाटकात काशिनाथ घाणेकर असायचे ते नाटक हिट झालेच म्हणून समजा. त्याकाळी काशिनाथ घाणेकर यांची लोकप्रियता सुद्धा खूप होती. काशिनाथ घाणेकर त्यांच्या गौरवर्णीय रंगानी आणि घाऱ्या डोळ्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालायचे. ते स्टेजवर आले कि टाळ्यांचा कडकडाट होत असतं. एवढा मोठा कलावंत असताना देखील काशिनाथ घाणेकर यांना दारूच्या व्यसनाची सवय होती. तर दिवसांप्रमाणे काशिनाथ हे काम करताना सुद्धा मद्य घेत असतं. आता दारू प्यायलेले काशिनाथ घाणेकर स्टेजवर साकारत असलेल्या भूमिकेला कसा न्याय देणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक स्टेजवर डोळे लावून बसलेले असायचे. परंतु काशिनाथ यांना स्टेजवर पाहिल्यानंतर ते दारू प्यायले असती अशी शंका सुद्धा येत नसे.
हे देखील वाचा: “थँक यु फॉर गिव्हिंग बर्थ टु रेणुका” आणि निर्मात्याने मानले आईचे आभार
एकदा काशिनाथ घाणेकर हे सहपत्नी दादांच्या “विच्छा माझी पुरी करा” या नाटकाच्या प्रयोगाला आले होते. त्यावेळेस नाटकातला एकदा विनोद चांगला झाला की, काशिनाथ हे मोठ्याने त्याला दाद देत. त्यामुळे स्टेजवर उपस्थित कलाकार सुद्धा विचलित होत असतं. काशिनाथ घाणेकर यांनी मद्याच्या अवस्थेत असताना स्टेजमागे जाऊन दादाचं कौतुक केलं होतं. ते तर्रर्र अवस्थेत असल्यामुळे दादांना हे मुळीच पातळ न्हवत. त्यांची दादानीं समजूत घातली होती. दादांनी त्यांना प्रेक्षकात बसवलं. ही अवस्था सांभाळताना त्यांच्या पत्नीची तारांबळ उडाली होती.(dada kondke got angry)
नक्की घाणेकर आणि दादांमध्ये घडलं काय होत…

काय आहे नेमका किस्सा ?(dada kondke got angry)
यानंतर काशिनाथ पुन्हा आले होते, तेव्हा लोकनाट्यातील एक प्रसंग सुरु होता. तेव्हा यावेळी ते स्टेजवर चं चढले आणि आरडाओरडा करू लागले होते. प्रयोग चालू असतानाच दादांनी काशिनाथ यांना प्रेक्षकांमध्ये बसविले. नंतर काशिनाथ कोणालाच आटपेना त्यामुळे दादांना कंटाळून काशिनाथ यांना दम द्यावा लागला.
ते काशिनाथ यांना म्हणाले “तू दारू पियुन प्रयोगाला येऊ नये आणि आलास तर प्यायला शिवाय यायला हवं” नाहीतर तुला प्रयोगाला यायला मला बंदी घालावी लागेल” दादांनी सांगितले काशिनाथ यांना मी ओरडलो याचं मला वाईट वाटलं दुःख देखील झालं. परंतु माझा नाईलाज होता. त्यांच्या अशा अचानक येण्यामुळे संपूर्ण नाटकाचा माहोल घरोबा होतं असे. परंतु याचा काशिनाथ घाणेकर यांना कधी राग आला नाही दादा आणि काशिनाथ घाणेकर यांची मैत्री कायम तशीच होती. आता आपल्यात दादा कोंडके आणि काशिनाथ घाणेकर जरी नसले, तरी त्यांच्या रंगभूमीवरील कार्यामुळे प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतील.