रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढी पुन्हा परतणार?, निर्मात्यांची भेट घेताना दिसला, चर्चांना उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 17, 2024 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढी पुन्हा परतणार?, निर्मात्यांची भेट घेताना दिसला, चर्चांना उधाण

लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरचरण सिंग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यावर्षी २२ एप्रिल रोजी हा अभिनेता दिल्लीतून बेपत्ता झाला होता. सुमारे महिनाभरानंतर तो आपल्या घरी परतला आहे. काही दिवसांपूर्वी, जेव्हा गुरुचरणला विमानतळावर स्पॉट केले गेले तेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो पुन्हा एकदा शोमध्ये सोढीच्या भूमिकेत लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे का?. यावर अभिनेत्याने उत्तर देत म्हटलं की, “देव जाणो. मला काहीच माहीत नाही. मला कळताच मी तुम्हाला नक्की कळवेन”. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

आता नुकतेच गुरुचरण सिंग ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोच्या सेटवर निर्माता असित मोदी यांच्याबरोबर दिसले. यावेळी असित मोदी म्हणाले की, “गुरुचरण सिंह हा माझ्या कुटुंबासारखा आहे. तो बराच काळ आमच्याशी जोडला गेला होता. मात्र काही वैयक्तिक समस्यांमुळे अभिनेत्याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडला होता”. मात्र, आता तो शोचे निर्माते असित मोदी यांना भेटला असून, त्याच्या या मालिकेत पुनरागमन झाल्याची अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “आमचा देव इतका गरीब आहे”, संकर्षण कऱ्हाडेने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग, म्हणाला, “गर्दीत हरवलेली ८० वर्षांची माय…”

View this post on Instagram

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग उर्फ ​​रोशन सिंग सोधी २२ एप्रिलपासून बेपत्ता झाला होता आणि जवळपास एक महिन्यानंतर तो अखेर घरी परतला होता. गुरुचरण सिंह २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला निघाला होता. पण एअरपोर्टपर्यंत तो पोहोचला नाही. गुरुचरण यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या वडिलांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली.

आणखी वाचा – “माझी पंढरी सजली”, ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेताही विठुरायाच्या भक्तीत तल्लीन, वारकऱ्यांच्या प्रतिकृतींनी सजवलं नवीन घर

दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी रोहित मीणा यांनी एक अपडेट देत असे सांगितले होते की, त्यांना काही समस्या येत होत्या ज्यामुळे ते धार्मिक यात्रेला गेले होते. परत आल्यानंतर गुरुचरण सिंह यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, ते अमृतसर व लुधियाना येथील गुरुद्वारांमध्ये वास्तव्यास होते.

Tags: entertainmentgurucharan singhgurucharan singh sodhiTaarak Mehta Ka Ooltah Chashmah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
hina khan social media post

“मला खूप त्रास...”, स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया होताच हिना खानची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “कोणत्याही व्यक्तीला...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.