शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आषाढी एकादशीला भारतात नाही पण…”, संकर्षण कऱ्हाडेला परदेशात मिळाला विठ्ठल पूजेचा मान, म्हणाला, “प्रयोग सुरु करायच्या आधी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 17, 2024 | 10:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Sankarshan Karhade received the honor of Vitthal Pooja in America and he shared a special post on social media.

“आषाढी एकादशीला भारतात नाही पण...”, संकर्षण कऱ्हाडेला परदेशात मिळाला विठ्ठल पूजेचा मान, म्हणाला, “प्रयोग सुरु करायच्या आधी...”

मराठी मनोरंजनसृष्टीतील एक चतुरस्त्र कलाकार म्हणून आपण ज्याला ओळखतो तो कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, उत्तम निवेदक, उत्तम दिग्दर्शक व एक उत्तम माणूस म्हणून तो चांगलाच लोकप्रिय आहे. संकर्षणच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे आणि त्याच्या कवितांचे अनेक चाहते आहेत. संकर्षण त्याच्या अभिनय, लिखाण व सादरीकरणामुळे जितका ओळखला जातो. तितकाच तो त्याच्या कवितांसाठीही ओळखला जातो. संकर्षणच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपल्या कविता व अभिनयामधून चर्चेत राहणारा संकर्षण त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर तो कवितांचे कार्यक्रम करत असतो. त्यांचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे. याच कार्यक्रमानिमित्त संकर्षण परदेशात  गेला असून आजच्या आषाढी वारीला तो भारतात नाही. त्यामुळे अभिनेता भारत व आजच्या आषाढी एकादशीच्या या खास दिवसाला खूप मिस करत होता. मात्र संकर्षणची ही इच्छा साक्षात विठुरायाने पूर्ण केली आहे असं म्हणायला हरकत नाही. संकर्षणला परदेशात विठ्ठल पूजेचा मान मिळाला असून त्याने त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – कुटुंबासह चाळीमध्येच राहायचे लक्ष्मीकांत बेर्डे, लेक अजूनही विसरला नाही ‘ते’ दिवस, म्हणाला, “पप्पांना पाहण्यासाठी गर्दी…”

संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमेरिकेतील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे खास फोटो शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “यावर्षीच्या आषाढी एकादशीला भारतात नाही. सारखं मनांत वाटत होतं की, “दर्शन कुठे घ्यावं?. ऊपवास कसा करावा?” पण अमेरिकेत ऑस्टीनमध्ये प्रयोग करायला आलो आणि तिथल्या मंडळाने प्रयोग सुरु करायच्या आधी विचारलं की, “आम्ही दरवर्षी पांडूरंगाची पूजा करतो, दिंडी आयोजित करतो. तर तुम्ही पुजेचा मान घ्याल का?” असं विचारलं. मला असं वाटलं की, विठ्ठलानेच साद घातली”.

आणखी वाचा – Video : हेचि दान देगा देवा! विठ्ठल भक्तीत रमले आदेश बांदेकर, अन्नदानही केलं अन्…; साधेपणाचं होतंय कौतुक

पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “विठ्ठलाची हाक जोवर वैंकुठातून येत नाही. कित्तीही ठरवा तुम्ही, पाऊल पंढरीकडे जात नाही. लाखो पाऊलं चालून, जेव्हा भेट ऊराऊरी होते. पांडूरंग करतो स्वागत आणि तेंव्हा खरी वारी होते”. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याला कमेंट्सद्वारे भाग्यवान म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्सद्वारे अभिनेत्याचे कौतुक केले आहे आणि त्याला आषाढी एकादशीच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.  

Tags: marathi actormarathi entertainment newssankarshan karhade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Appi Amchi Collector Serial Update

अप्पीने अर्जुनला केलं प्रपोज, एकमेकांना समजून घेत पुन्हा प्रेमात पडणार का?, आर्यासमोर येणार दोघांमधील प्रेम अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.