दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आली होती. ३ जुलै २०२४ रोजी तिने तिचा बॉयफ्रेंड निकोलाई सचदेवबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. थायलँडमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले. मात्र आता लग्नानंतर काही दिवसांतच तिचा नवरा निकोलाईने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लग्नानंतर काही दिवसांत दोघांनीही पत्रकारपरिषद घेतली. यामध्ये त्यांनी एक घोषणा केली आहे. (south actress varlakshmi sarathkumar husband)
वरलक्ष्मी व निकोलाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोघांनी आपला परिचाय करुन दिला. यावेळी निकोलाईने तमिळ न बोलता आल्यामुळे माफीदेखील मागितली. त्यावेळी तो म्हणाला की, “वरलक्ष्मी लग्नानंतर तिचे नाव बदलू इच्छित आहे. नक्कीच तिला सारथकुमार हे आडनाव लावणं सोडणार नाही. मात्र तिला सचदेवहे आडनावही लावायचं आहे. पण मी असं होऊ देणार नाही”.
पुढे ती म्हणाली की, “ती नेहमी असेल आणि तिचे नाव वरलक्ष्मी सारथकुमारच राहील. मी तिचे नाव लावेन. मी माझं नाव निकोलाई वरलक्ष्मी सरथकुमार सचदेव असं ठेवेन आणि हीच माझी ओळख असेल. त्याचप्रमाणे माझी मुलगीदेखील हेच नाव लावेल. मी माझ्या पत्नीसाठी हे करायला तयार आहे. मी व माझी मुलगी हा वारसा पुढे नेऊ”.
पुढे तो म्हणाला की, “लग्नानंतरही ती तिचे काम सुरु ठेवेल. मी वरलक्ष्मीला खूप वर्षांपासून ओळखतो. माझे लग्न तिच्याबरोबर झाले असले तरीही मी तिचे पहिले प्रेम नाही. चित्रपटच तिचं पहिलं प्रेम आहे आणि ओळखही. मी दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्यामुळे ती तिचे काम सुरुच ठेवेल. कामांमध्ये ती कोणताही ब्रेक घेणार नाही”.दरम्यान निकोलाई घटस्फोटीत असल्याने त्याच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने वरलक्ष्मीवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. मात्र तिने सगळ्याकडे दुर्लक्ष करत निकोलाईबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.