दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खूप कमी वेळातचं मराठी सिनेसृष्टीत स्वतःच स्थान भक्कम केलं आहे. नागराज यांना सिनेसृष्टीत यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. नागराज यांच्या प्रॉडक्शनच्या खाली नुकताच घर, बंदूक, बिर्याणी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटला आला. अशातच नागराज मंजुळे यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. (Nagraj Manjule New Movie)
नागराज मंजुळे लवकरच कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावरील जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या संदर्भातली पोस्ट नागराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर नुकतीच शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये नागराज यांनी “ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यावर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. फँड्री,सैराट नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल…! असे म्हणत पोस्टच्या शेवटी त्यांनी चांगभलं ! म्हणत शुभ संकेत दिले आहेत.

हे देखील वाचा: बायकोचा हात हातात प्रभाकर मोरेंचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज
नागराज मंजुळे यांना त्यांच्या वास्तविक आयुष्यात आलेल्या अनुभवातून त्यांनी चित्रपट बनवायला सुरुवात केली.
नागराज ह्यांच्या घरी त्याचे वडील प्रमाणाच्या बाहेर मद्य पीत असायचे. नागराज सुद्धा त्यांना मद्य आणून देत असे, परंतु त्यांना मद्य आणून देता देता नागराज स्वतः कधी दारूच्या अधीन गेले, हे त्यांना स्वतःला समजलं नाही. परंतु काही काळानंतर नागराज यांना ते चुकीचं वागत असल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी हे सगळं सोडायचा खूप प्रयत्न केला. आणि त्यांनी अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित केलं. (Nagraj Manjule New Movie)
हे देखील वाचा: मृणालच्या लेकीची सायकल सवारी,क्युट व्हिडीओ नक्की बघा
कॉलेजात शिकत असताना त्यांनी एका लघु पटाची निर्मिती केली होती, त्यांच्या या लघुपटाला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. यानंतर नागराज यांची चित्रपटामध्ये रुची वाढत गेली. यानंतर नागराज यांचा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला फॅन्ड्री हा पहिला सिनेमा होता. आणि त्या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम देखील दिलं होतं. नागराज यांचं स्वतःच आटपाट प्रोडक्शन नावाचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे.