‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम, श्रीकांत, पारू, सावित्री यांनी मिळून आदित्य व अहिल्यादेवी यांना एकत्र आणायचा प्लॅन केलेला असतो. आणि हा प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गावरच असतो. सांगितल्याप्रमाणे मुलाखत घेणारी घरी येते त्यावेळेला अहिल्यादेवीही आदित्यने दिलेली साडी नेसून मुलाखत द्यायला येतात. तर इकडे दामिनी घराबाहेर त्या इंटरनॅशनल मुलाखत घेणाऱ्यांची वाट पाहत असतात. इतकंच नव्हे तर दामिनी बंगल्याबाहेर साफसफाई करते तेव्हढ्यात तिथं दिशा येते. दामिनीला केर काढताना पाहून दिशाला धक्काच बसतो. दिशा दामिनीला विचारते हे तुम्ही काय करत आहात. (Paaru serial update)
यावर दामिनी सांगते की, आज इंटरनॅशनल मुलाखत घेणारी येणारे आहे तू आता फक्त बघतच रहा. तेव्हा दिशा मनातल्या मनात विचार करते की, जाऊ दे हिच्याबरोबर इथे राहिलं तर मला सासू मॉमची मुलाखत पाहता येणार नाही, असं म्हणून दिशा तिकडून निघून जाते. तर प्रीतम एका माणसाला पैसे देतो आणि दामिनीची मदत करायला सांगतो. दामिनी त्या माणसालाच मुलाखत घेणाऱ्या पैकी एक समजून त्याला तिथे बसवून स्वतःबद्दल माहिती देऊ लागते. तर इकडे आतमध्ये मुलाखत घेणारी मुलाखत घ्यायला सुरुवात करते. त्यावेळेला प्रीतम ब्लूटूथ कनेक्ट करून तो गणि व मारुती बरोबर त्यांच्या घरी हे शूट लाईव्ह बघत असतो.
आणि मुलाखत घ्यायला आलेल्यांना सल्ले देत असतो. मुलाखत घ्यायला ती सुरुवात करते तेव्हा सुरुवातीला ती अहिल्यादेवींचा प्रवास विचारते. अहिल्यादेवींच्या प्रवासानंतर आता सध्या अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा हा संपूर्ण बिजनेसचा भार त्यांचा मोठा मुलगा आदित्यवर आहे. त्यामुळे आदित्य ही जबाबदारी कशी पार पाडत आहे याबद्दल विचारतो. अहिल्यादेवी थोडक्यात आणि अचूक उत्तर देत प्रश्न पुढे नेतात. त्यानंतर मुलाखत घेणारी अहिल्यादेवींना तिच्या व आदित्यच्या बॉंडिंगबद्दल विचारते. यावर हा वैयक्तिक प्रश्न असल्याचा सांगत अहिल्यादेवी या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार देतात. त्याच वेळेला आदित्यला पारू बोलावून घेऊन येते आणि आदित्य ही या मुलाखतीमध्ये जॉईन होतो.
आता मालिकेच्या येणाऱ्या भागात मुलाखत घेणारी आदित्यला प्रश्न विचारते तेव्हा आदित्य आई या शब्दाचा त्याच्या आयुष्यातील अर्थ काय आहे आणि ती किती इम्पॉर्टंट आहे याबद्दल बोलताना दिसणार आहे. मात्र हे सगळं बोलत असतानाच अहिल्यादेवी ही मुलाखत थांबवतात आणि इथं काय सुरु आहे असे विचारतात. आता ही मुलाखत पूर्ण होणार का?, या मुलाखतीमुळे आदित्य व अहिल्यादेवी एकत्र येणार का हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.