मराठीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी शैलीला तोड नाही.आज जरी लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नसले तरीही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांचा काळ गाजवलंय. तसेच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला तर विनोदवीरांची जोडी म्हणून ओळखली जाते.यासोबतच विनोदाचा बादशहा ते खलनायक आणि गंभीर भूमिकाही अशोक सराफ यांनी तितक्याच ताकदीने पडद्यावर रंगवल्या आहे.त्यांनी मराठी हिंदी मनोरंजन सृष्टीत कमालीची कामगिरी केली. अनेक कलाकाकर आजही त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात.अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कधीच कोणाशी केली जाऊ शकत नाही असं असताना काही चाहत्यांनी या जोडीची तुलना भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेसोबत केली आहे.(Kushal Badrike)

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेता कुशल बद्रिके हे त्यांच्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांना हसण्यासाठी भाग पाडतात.हे सोशल मीडियावर देखील कमालीचे सक्रिय असतात. नुकताच कुशल परदेशात असून त्याने परदेशातील एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.त्याच्या सिनेमाचं चित्रीकरण परदेशात सुरू आहे, कुशलनं नुकताच त्याचा एक बॉलिवूड स्टाईल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला त्यानं एक कॅप्शन देखील दिल.कुशलनं म्हटलं आहे की असलं एखादं गाणं आपल्यावर shoot व्हायला हवं यार. तो पर्यंत दुसऱ्यांच्या गाण्यांवर enjoy करत राहू. कुशल या व्हिडिओत दणक्यात वॉक करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना देखील कुशलचा हा अंदाज चांगलाच भावला आहे. चाहत्यांनी यावर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. यातील काही कमेंट मात्र कुशलचं लक्ष वेधून घेत आहे.(Kushal Badrike)
हे देखील वाचा: कलाकारांची मांदियाळी आणि सामाजिक विषय हाताळणारा चौकचा टिझर म्हणतोय ‘ वाघ आला वाघ’
लक्षवेधी चाहत्यांच्या कमेंट
कुशलच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं आहे की ,अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या जोडी नंतर कुशल भाऊ आणि भाऊ कदम यांची जोडी पाहायला आवडली राव.. तर दुसर्याने लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामा नंतर तूच आहेस रे भाव आम्हाला हसवणारा असं म्हणत.भाऊ आणि कुशलची तुलना अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी केलीय.तर यावर कुशलने देखील हार्ट इमोजी शेअर करत रिप्लाय दिलाय. चला हवा येऊ द्या या शो मधील भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची जोडी तर हिट आहे पण या सोबत यांची जोडी पांडू हवालदार या चित्रपटात देखील पाहायला मिळाली होती.
