झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत एकामागोमाग येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका एका उंचीवर पोहोचली आहे. मालिकेत सध्या नेत्रा गरोदर असून तिच्या पोटात विरोचकाचा अंश वाढत असल्याचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. रुपालीने अद्वैतचे प्रतिबिंब तयार करुन ते नेत्राच्या खोलीत पाठवले होते. मग ते प्रतिबिंब नेत्राच्या पोटावर हात ठेवून मंत्र म्हणतं. याचदरम्यान रुपाली वीणा वाजवून नवीन शक्ती निर्माण करत असते.
त्यानंतर रुपाली तिच्या खोलीत जाऊन वीणाची तार तोडते. पुढे नेत्राच्या पोटातील बाळ हे विरोचकाचंच अंश आहे. तिच्या पोटात दैवी असं काही नाही असं विरोचक रुपालीला सांगतो. घरात चाललेल्या या सर्व गोंधळातून मार्ग दाखवण्यासाठी नेत्रा देवीआईकडे प्रार्थना करते. नेत्रा एक आई म्हणून मी तुझ्याकडे माझ्या बाळाला सुखरुप ठेव अशी प्रार्थना करत आहे’ असं म्हणत प्रार्थना करते. नेत्राने देवीआईकडे प्रार्थना करताच देवाआईच्या दिशेकडून नेत्राकडे काही पाउलं चालत येतात. कुंकवाच्या पाऊलांद्वारे देवीआई नेत्राला नक्की काय संदेश देऊ पाहत आहे ही कळत नाहीये.
अशातच आता या मालिकेचा आणखी एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या नवीन प्रोमोमध्ये इंद्राणी रुपालीला आता ३ महिने झाले असून तुझ्या अंतासाठी फक्त आता सहाच महिने उरले आहेत. ज्यादिवशी नेत्राचे बाळ या जगात येईल, त्याचदिवशी तुझा वध होईल आणि तो दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. अशातच या प्रोमोच्याखाली “रुपालीचा अंत जवळ आलाय की काहीतरी वेगळंच घडणार?” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – जावयाने शत्रुघ्न सिन्हा यांना दिलं खास सरप्राईज, सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस दणक्यात केला साजरा
दरम्यान, नेत्राच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचाच अंश आहे हे त्यांना अद्याप माहिती नाही. त्यामुळे आता नेत्राला याबद्दल कधी कळणार? देवीआई नेत्राला यातून काय नवीन मार्ग दाखवणार? आणि विरोचकाचा वध नक्की कुणाच्या हातून होणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.