अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने तिने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दगडी चाळ चित्रपटातील तिची भूमिका ही विशेष लक्षवेधी ठरली. खार सांगायचं तर या चित्रपटातील तिच्या सोनल या पत्राने तिला खरी लोकप्रियता मिळाली. पूजा सावंतचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. सोशल मीडियावरही पूजा खूप ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर काही ना काही शेअर करून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.(Pooja Sawant New Project)
पहा पूजाची नवी इनिंग (Pooja Sawant New Project)
अशातच पूजाच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय. Preparing for my next असं म्हणत तिने स्क्रिप्ट वाचतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान स्क्रिप्ट मधील पात्रांची नाव दाखवत तिने स्क्रिप्टच्या एका पानाचा फोटो शेअर केलाय.

यांत क्रेया, मेघा, अमेया, मिथिला अशी पात्रांची नाव आणि त्यांचे संवाद पाहायला मिळतायत. मात्र या पात्रांपैकी पूजा नेमकी कोणते पात्र साकारणार आहे आणि हा चित्रपट आहे की आणखी काही हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करत पूजाला विचारलंय की, एच्यात तुमच्या कॅरेक्टर च काय नाव आहे ,,?.(Pooja Sawant New Project)
हे देखील वाचा – बांधकाम सुरु आहे, प्रिया मराठेचा फायर अंदाज
अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘दगडी चाळ २ ’ हा तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर तिचं एक गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये पूजा सावंत अभिनेता वैभव तत्त्ववादीबरोबर दिसली. प्रेक्षकांचाही या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अभिनेता भूषण प्रधानबरोबर तिने दिवाळीनिमित्त एक जाहिरात केली यादरम्यान पूजा चर्चेचा विषय बनली होती. कारण पूजा आणि वैभव हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या जोरदार चर्चांना उधाण आले होते.
