छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते. ही मालिका टीआरपी यादीत कायम टॉप ५ मध्ये असते. यातील प्रत्येक पात्र चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर चाहते भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील नायिका जेवढी गाजली. तेवढीच गाजली ती मालिकेची खलनायिका माधवी निमकर. माधवीची भूमिका नकारात्मक असली तरी तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. माधवी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.
माधवी अभिनय करण्याबरोबरच तिच्या फिटनेसचीही तितकीच काळजी घेते. ती तिच्या योगाचे व व्यायामाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते आणि तिच्या या फोटो व व्हिडीओला चहाते लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद देत असतात. अशातच तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये माधवीचा लेक तिचे केस बांधत असल्याचे दिसत आहे. माधवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून मायलेकामधील हे खास क्षण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
माधवीचा लेक तिच्या केसांची वेणी बांधत असून तो त्याच्या लहान हातांनी तिच्या केसांना रबरही लावत आहे. केस बांधून झाल्यानंतर तो आईची पापीदेखील घेतो. या व्हिडीओला माधवीने ‘मिस्टर और मिसेस माही’ या चित्रपटातील ‘तू हैं तो’ हे गाणं लावलं आहे. या गाण्यातील तू सोबत असशील तर काहीच कमी नाही या अर्थाप्रमाणेच आई-मुलाचे नाते असते आणि माधवीने शेअर केलेल्या या व्हिडीओमधूनही तिचा मुलाबरोबरचा खास बॉण्ड दिसून येत आहे.
आणखी वाचा – ‘अशी ही बनवाबनवी’चा दूसरा भाग कधीच येणार नाही, सचिन पिळगावकरांचा खुलासा, म्हणाले, “आता लक्ष्या नाही…”
माधवी निमकरच्या लेकाचे नाव रुबेन असं असून तिचे मुलाबरोबरचे नात हे खूपच खास आहे. माधवी त्याच्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, माधवीने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “किती गोड, खूपच छान, मुलगा हा आईचा पहिला मित्र असतो, सर्वात निर्मळ नाते, खूप छान व्हिडीओ” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.