शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत अंबानीच्या लग्नाची जगावेगळी तयारी, पाहुण्यांना देणार गिफ्ट, एका भेटवस्तूची किंमत आहे तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 11, 2024 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani And Radhika Merchant Wedding

अनंत अंबानीच्या लग्नाची जगावेगळी तयारी, पाहुण्यांना देणार गिफ्ट, एका भेटवस्तूची किंमत आहे तब्बल…

मुकेश अंबानी व नीता अंबानी त्यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या लग्नात कोणतीही कसर सोडत नाही आहेत. अनंत अंबानी १२ जुलैला राधिका मर्चंटसह लग्नगाठ बांधणार आहे. या शाही विवाहसोहळ्याचे कार्यक्रम सलग तीन दिवस चालणार असून १४ जुलै रोजी संपणार आहेत. अशातच लग्नाच्या काही दिवसांपूर्वीपासून लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. नुकताच राधिका व अनंत यांचा संगीत व हळदी समारंभ दणक्यात पार पडला. ज्यामध्ये कुटुंबियांव्यतिरिक्त अनेक सिनेतारकांनीही सहभाग घेतला होता. मुकेश अंबानी यांनी अनंत व राधिकाच्या लग्नाची खास तयारी केली असून परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केले आहे. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी खास खासगी जेटही तयार करण्यात आले आहे. (Anant Ambani And Radhika Merchant Wedding)

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार, देश व जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे. एवढेच नाही तर परदेशातूनही अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सांभाळणार आहेत. मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब झेड प्लस सुरक्षेत असेल. आयएसओएस (इंटिग्रेटेड सिक्युरिटी ऑपरेटिंग सिस्टीम) सेटअपदेखील स्थापित करण्यात आला आहे. बीकेसीमध्ये १० एनएसजी कमांडो आणि पोलीस अधिकारी, २०० आंतरराष्ट्रीय सुरक्षा रक्षक, ३०० सुरक्षा सदस्य आणि १०० हून अधिक वाहतूक आणि मुंबई पोलीस कर्मचारी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलही तैनात असेल. त्याचवेळी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी फाल्कन-२००० सह १०० खासगी विमाने सज्ज आहेत.

आणखी वाचा – ‘अशी ही बनवाबनवी’चा दूसरा भाग कधीच येणार नाही, सचिन पिळगावकरांचा खुलासा, म्हणाले, “आता लक्ष्या नाही…”

View this post on Instagram

A post shared by radhikamerchantfp (@radhikamerchant_)

अनंत व राधिका फ्लॅशमॉबसह लग्नात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या देखरेखीखाली ६० डान्सर्सबरोबर ते परफॉर्म करणार आहेत. त्याचवेळी, ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या ‘स्वदेश’च्या कारागिरांच्या सहकार्याने मनीष मल्होत्रा ​​यांनी लग्नाचे सर्व पोशाख डिझाइन केले आहेत. राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या मेन्यूबद्दल सांगायचे तर, यात हजाराहून अधिक पदार्थांचा समावेश असेल. असे सांगितले जात आहे की, १० हून अधिक आंतरराष्ट्रीय शेफ हे पदार्थ तयार करतील.

आणखी वाचा – हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटावरुन ट्रोल करणाऱ्यांना पत्नीची समज, ट्रोलर्सला फटकारलं आणि…; म्हणाली, “कोणत्या परिस्थितीतून…”

एवढेच नाही तर व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास रिटर्न गिफ्ट् तयार करण्यात आल्या असून ही घड्याळे करोडो रुपयांची आहेत. या परतीच्या भेटवस्तू अनेक राज्यांतून बनवून आणल्या आहेत. घड्याळे फक्त व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी असतील आणि राजकोट, काश्मीर व बनारसमधील उर्वरित पाहुण्यांसाठी रिटर्न गिफ्ट् तयार करण्यात आल्या आहेत.

Tags: ambani familyanant ambani and radhika merchant weddinganant ambani weddingmukesh ambani and neet ambani
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bollywood actress Rekha's father Gemini Ganesan married four times and he has eight children know more about him

आठ मुलं, चार स्त्रियांबरोबर अफेअर अन्...; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांचं वादग्रस्त आयुष्य, आयुष्यभर त्यांचा तिरस्कार केला आणि...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.