सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या कालच्या भागात केतकी काकू पाणी आणायला बाहेर पडली तेव्हा तिला रुपाली दिसते. रुपाली केतकी काकूला घाबरवण्याचा प्रयत्न करते. मात्र केतकी काकू तिला न घाबरता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रुपाली हातात चाकू घेऊन केतकी काकूला दाखवते. त्यानंतर ती मी तुला कधीच मारून टाकलं असतं पण तुझ्यापेक्षा मला नेत्रा व तिचे बाळ गरजेचं आहे असं म्हणते. त्यानंतर केतकी काकू आपल्या खोलीत येते.
पुढे नेत्रा-अद्वैत डॉक्टरांकडे घडलेला प्रकार इंद्राणी व शेखर यांना सांगतात. तेव्हा नेत्रा यापासून सावध राहण्याविषयी सांगते. मात्र अद्वैत घरातील सर्वांना घाबरु नये असं समजावून सांगतो. पुढे केतकी काकू, तेजस, फाल्गुनी आणि तन्मय एकमेकांशी खोलीत बसून बोलत असताना तिथे रुपाली येते आणि ती पुन्हा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो नेत्राच्या बाळाबद्दलही त्यांच्याकडे विचारपूस करते. तेव्हा इंद्राणी तिथे येऊन रुपालीला खोलीबाहेर काढते. पुढे नेत्रा देवीआईची पूजा करत असताना तिच्याकडे घडलेल्या प्रकाराबद्दल संवाद साधत असते.
यावेळी ती देवी आईला विरोचाकाला मिळालेली प्रतिबिंब शक्ती, मला तू दिलेला ध्वज आणि माझ्या पोटात वाढत असलेल्या बाळाच्या हृदयाचे दोनठोके यांचा नक्की काय संबंध आहे. यातून तुला नक्की काय सुचवायचं आहे. हे मला कळत नाहीये, त्यामुळे एक आई म्हणून मी तुझ्याकडे माझ्या बाळाला सुखरुप ठेव अशी प्रार्थना करत आहे’ असं म्हणते. नेत्राने आईकडे मदत मागताच देवाआईच्या दिशेकडून नेत्राकडे काही पाउलं चालत येतात. यानंतर तिथे अद्वैत येतो तेव्हा नेत्रा त्याला ते पाऊल दाखवत असते, मात्र ती पाऊलं तेव्हा तिथून गायब झालेली असतात. त्यामुळे हा देवीआईचाच काही तरी शुभ संकेत असल्याचे अद्वैत नेत्राला सांगतो.
आणखी वाचा – मेष व सिंह राशींच्या लोकांना गुरुवारी मिळणार आनंदवार्ता, कुणाला नोकरीत नफा तर कुणाला व्यवसायात, जाणून घ्या…
त्यानंतर नेत्रा फाल्गुनी केतकी काकू यांच्या खोलीत जाते. तेव्हातिला बघून सगळेच आनंदी होतात. यावेळी घाबरलेल्या केतकी काकू झ फाल्गुनी तेजस व तन्मय यांना नेत्रा धीर देण्याचा प्रयत्न करते. यावेळी ती आता घाबरण्याचे काहीही कारण नाही असं सर्वांना म्हणते. त्यामुळे आता देवीआईने दिलेले शुभसंकेत नक्की काय आहेत हे पुढील भागात पाहायला मिळेल