रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमचा रिचार्ज जस्टिन बीबरच्या पाकिटात गेला”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अंबानी कुटुंबियांना टोला, म्हणाली, “आम्हाला सगळं कळतं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 8, 2024 | 2:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gauri Kulkarni On Anant Ambani Wedding

"आमचा रिचार्ज जस्टिन बीबरच्या पाकिटात गेला", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अंबानी कुटुंबियांना टोला, म्हणाली, "आम्हाला सगळं कळतं…"

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची. नुकताच अनंत व राधिका यांचा संगीत सोहळा अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर राजकीय व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळींनाही यावेळी आमंत्रित करण्यात आले. सोशल मीडियावर तर त्यांच्या या शाही लग्नसोहळ्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या संगीत सोहळ्यात परदेशी पाहुण्याने धुमाकूळ घातला आहे. (Gauri Kulkarni On Anant Ambani Wedding)

पॉप स्टार जस्टिन बीबरने या लग्नात त्याच्या कलेने साऱ्यांची मन जिंकली. जस्टिनच्या भारतीय चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या सोहळ्यात परफॉर्मन्स सादर केल्यानंतर तो तातडीने मियामीला रवाना झाला. जस्टिनने या कार्यक्रमासाठी घेतलेल्या मानधनाची सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी जस्टिनने घेतलेल्या माधनावरुन आता मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिनने त्याच्या अनेक हिट गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्ससाठी त्याने तगडे मानधन घेतल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा – दिशाचा डाव तिच्यावरच उलटला, दारू पिऊन आलेल्या आदित्यला पारूने वाचवलं, अहिल्यादेवींपासून दूर नेलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Gauri🐾 (@gaurikulkarni23)

यावर ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. गौरीने या पोस्टद्वारे असे म्हटले आहे की, “माझ्या २९ रुपयांच्या रिचार्जचे पैसे जस्टिन बीबरच्या खिशात गेले”. यासह कॅप्शन देत तिने असे म्हटले की, “जस्ट-इन तुझ्या ही गोष्ट लक्षात आली नसेल जस्टिन बीबर. पण आम्हाला सगळं कळतं”. तिने या पोस्टसाठी #ambaniwedding असा हॅशटॅगही वापरला आहे.

आणखी वाचा – हार्दिक पांडे व नताशाचा लवकरच घटस्फोट होणार?, भारताच्या विजयानंतर नवऱ्याबरोबर दिसलीही नाही, म्हणाली, “देव आयुष्यातील…”

सध्या अंबानींच्या घरात अनंत-राधिकाचे लग्नाआधीचे विधी पार पडत असतानाच जिओचे मोबाइल रिचार्ज सुद्धा महागले आहेत. त्यामुळे लेकाच्या लग्नासाठी अंबानींनी रिचार्जचे दर वाढवलेत अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहेत. तर, अनेक क्रिएटर्सनी यावर मीम्स देखील बनवले आहेत. येत्या १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत. या शाही लग्नाला बॉलीवूड कलाकारांसह अनेक परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Tags: Anant Ambani and Radhika Merchantgauri kulkarniGauri Kulkarni On Anant Ambani Weddingmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
Bollywood actress Rekha revealed in an old interview that she drank a lot of alcohol and took drugs also.

"मी खूप दारू प्यायले, ड्रग्जही घेतले अन्...", रेखा यांचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, "कुणीही मला विचारलं नाही की..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.