‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी आदित्यबरोबर बोलत नसतात. त्यामुळे आदित्य दारू पिऊन किर्लोस्कर बंगल्यात येतो. त्यावेळेला पारू त्याला वाचवते आणि एका झाडामागे लपून बसते. तर सगळेजण त्या दारुड्या माणसाला शोधत असतात. तर इकडे प्रीतम प्रियाशी बोलत असतो तेव्हा प्रिया सांगते की, मला खूपच उशीर झाला आहे. तेव्हा प्रीतम सांगतो की, मी तुम्हाला सोडायला येतो हे बोलत असतानाच प्रीतमच लक्ष बंगल्याबाहेर जातं. तेव्हा दिशा दामिनी सगळेजण शोधत असताना त्याला दिसतात तर पारू आदित्यला घेऊन लपून एका साईडला लपून बसलेली यो पाहतो त्यावेळेला प्रीतमच्या लक्षात येतं की दादा दारू पिऊन आलेला आहे म्हणून प्रीतम नाटक करतो आणि अहिल्यादेवीसमोर येतो. (Paaru Serial update)
अहिल्यादेवी म्हणतात की, प्रीतम तू दारू प्यायलास का?, मला आधी वाटलेलं आदित्यबरोबर राहून तू सुधारला आहेस पण तू काही सुधारला नाहीस. यावर प्रीतम अहिल्यादेवींनाच दोष देत सांगतो की, मी तुझ्यामुळे दारू प्यायलो. तू दादाशी बोलत नाही आहेस, दादा त्याच्यामुळे नीट वागत नाही आणि माझ्याशी पण बोलत नाही आहे, त्यामुळे मला टेन्शन आलं आणि म्हणून मी दारू प्यायलो. यावर अहिल्यादेवी प्रीतमच्या सनसनीत कानाखाली लगावतात आणि सांगतात की मला माझ्या दोन्ही मुलांची तोंड बघायची नाही आहेत. त्यानंतर सगळेजण घरात जातात तेव्हा दिशाला कळतं की प्रीतम हा नाटक करतोय. काही वेळाने प्रीतम प्रियाला सोडायला म्हणून तिच्याजवळ येतो आणि सांगतो की, चला मी तुम्हाला सोडतो. तोपर्यंत प्रियानेवरुन सगळं काही पाहिलेलं असतं. ती सांगते की, तुम्ही इतके वाईट नाही आहात. तुम्ही तुमच्या भावाला वाचवायला काही करु शकता. त्यामुळे आपल्यात मैत्री होऊ शकते आणि माझं नाव प्रिया आहे हे सुद्धा ती सांगते. यावर प्रीतम खूप खुश होतो. त्यानंतर प्रीतम प्रियाला सोडायला जातो.
तर इकडे पारू आदित्यला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन आलेली असते. आदित्य सतत बडबडत असतो. मात्र पारू त्याची समज काढते आणि त्याला शांत झोपायला सांगते. त्याच वेळेला पारुच्या गळ्यातील मंगळसूत्रही आदित्यला दिसतं. मात्र आदित्य नशेत असतो तो म्हणतो की, हे मंगळसूत्र कोणाचा आहे?, तू कधी लग्न केलं?, हे मला सुद्धा सांगितलं नाहीस का?, असं म्हणत तिच्याकडे बघत राहतो. त्यानंतर पारू त्याला झोपवून निघून जाते. अहिल्यादेवी आणि मोहन दुसऱ्या दिवशीच्या मीटिंगबद्दल बोलत असतात तेव्हा तिथं दिशा येते आणि सांगते की, तो दारुडा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आदित्य होता आणि प्रीतम आदित्यची चूक लपवायला हे नाटक केलं असं सांगते. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींच्या पायाखालची जमीन सरकते. अहिल्यादेवी नक्की खरं खोटं काय हे पाहायला आदीत्यच्या रूममध्ये जातात. मात्र त्या रूममध्ये जाण्याआधी बाहेर थांबतात आणि सांगतात की मोहन तू हे बघ. माझ्या डोळ्यांनी हे पहावणार नाही. मोहन आत जातो तेव्हा मोहन बघतो तर आदित्य झोपलेला असतो मात्र आदित्य बडबडत असतो. तेव्हा त्याच्या लक्षात येत की, आदित्य दारू पिऊन आला आहे मात्र मोहन बाहेर येऊन खोटं सांगतो की आदित्य दमला आहे त्याच्यामुळे तो थकून झोपला आहे. मात्र आदित्यने दारू प्यायलेली नाही. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी दिशाची चांगलीच कानउघडणी करतात.
तर इकडे पारू प्रीतमला भेटते. तेव्हा प्रीतम प्रियाबद्दल पारूला सांगतो. मात्र पारू प्रीतमवर रागावते आणि सांगते की, तुम्ही दुसरा कोणाचाही विचार करु नका. तुमच्यावर नवीन संकट आता ओढावून घेऊ नका. हे ऐकल्यावर पारू सांगते की, आपण जर अहिल्यादेवी व आदित्य सरांना एकत्र आणायचं असेल तर काहीतरी नवीन प्लॅन करायला पाहिजे. त्यामुळे प्रश्न उत्तरांच्या खेळाबाबत ती प्रीतमला सांगते. आता प्रीतम व पारू मिळून नवीन काय असा कोणता प्लॅन आखणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.