सध्या देशभरात अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. १२ जुलै रोजी दोघंही लग्नबांधनात अडकणार आहेत. याआधी लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा संगीत सोहळा पार पडला आहे. या संगीत सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होते. तसेच अंबानी कुटुंबाचादेखील स्पेशल परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे तो हॉलीवूड पॉपसिंगर जस्टीन बीबरचा परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला. जस्टीनच्या परफॉरमन्सने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. आशातच प्रसिद्ध अभिनेता व विनोदी कलाकार जावेद जाफरी यांची मुलगी खूप चर्चेत आली आहे. (Anant Ambani and Radhika Merchant Wedding )
जावेद जाफरीची मुलगी आलवियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती जस्टीनच्या परफॉर्मन्सच्या वेळी खूप खुश असलेली दिसून येत आहे. आलवियाने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये खूप खुश असलेली दिसून येत आहे. तसेच ती जस्टीनला मिठी मारतानाही दिसत आहे. तसेच त्याच्याबरोबर स्टेजवरही दिसून येत आहे.
आणखी वाचा – Video : नातवंडांबरोबर नीता-मुकेश अंबानींचा भन्नाट डान्स, जावयालाही नाचवलं, जगभरात चर्चा
याबरोबरच आलवियाचा भाऊ देखील बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान, अनंत अंबानी, वीर व शिखर पहाडिया यांच्याबरोबर ‘ऐसा पहली बार हुआ है’ तसेच अनन्या पांडे व विद्या बालन यांच्याबरोबरही डान्स करताना दिसली. याचवेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बरोबर अमिताभ बच्चन यांनी नात नव्या नवेलीबरोबर गप्पा मारताना दिसला.
अंबानी कुटुंबाने देखील ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील गाण्यावर एकत्रितपणे डान्स करताना दिसले. त्यांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. तसेच त्यांच्या डान्सचे कौतुकदेखील करण्यात आले. नीता व मुकेश अंबानींचा एक वेगळाच अंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला. अनंत व राधिकाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र झाली असून १२ जुलै २०२४ रोजी मुंबईमधील जिओ वल्ड कन्व्हेशन सेंटरमध्ये लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नासाठी जगभरातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.