शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दोन किंवा पाच लग्न करा पण…”, अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीवर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “माझा नवरा मुस्लिम असून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 6, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Devoleena Bhattacharjee On Payal Malik

"दोन किंवा पाच लग्न करा पण…", अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीवर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, "माझा नवरा मुस्लिम असून…"

‘बिग बॉस ओटीटी ३’ सध्या बरंच चर्चेत असलेलं पाहायला मिळत आहे. या शोमधील सर्वच स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच अरमान मलिक व त्याच्या दोन पत्नी कायम चर्चेत राहिल्या. मात्र अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीला हा शो सोडावा लागला. पायल मलिकने ‘बिग बॉस ओटीटी ३’ मधून बाहेर आल्यानंतर देवोलीनाच्या बहुपत्नीत्वावरील पोस्टला सडेतोड उत्तर दिले होते. ज्यानंतर आता देवोलिना भट्टाचार्जी हिनेही यावर प्रत्युत्तर दिले आहे. पायलने दुस-या धर्मात लग्न केल्यामुळे अभिनेत्रीवर झालेल्या टीकेचा उल्लेख केला होता. त्याचवेळी, अभिनेत्रीने तिचा नवरा एकनिष्ठ असल्याचे म्हटले आहे. तो बहुपत्नीत्वाचे समर्थन करत नाही असेही म्हटले. देवोलीनाने अरमान मलिकच्या लग्नावर टीका केली होती. अलीकडेच पायल घराबाहेर आल्यानंतर तिला देवोलीनाच्या विचारांवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यानंतर तिने देवोलीनाला त्यांच्या नात्यावर भाष्य करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. (Devoleena Bhattacharjee On Payal Malik)

यानंतर आता देवोलीनाने पुन्हा एक लांबलचक पोस्ट टाकली असून पायलला उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले, “एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या धर्मातील विवाह व बहुपत्नीत्वाची तुलना करण्यासाठी उच्च पातळीचे ज्ञान आवश्यक आहे. मला खात्री आहे की बुद्धिमान लोक बरेच जागरुक आहेत. आणि बहुपत्नीत्वासारख्या बेकायदेशीर कृतीच्या विरोधात उभे राहणे हा फक्त माझा अधिकार नाही तर प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. जो राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर दाखवण्यात त्यांना खूप अभिमान वाटतो. रात्रंदिवस त्रास सहन करणाऱ्या आणि रोज थोड्या थोड्या मरणाऱ्या त्या गरीब स्त्रियांच्या जीवनाची चेष्टा करु नका”.

आणखी वाचा – Video : अंबानींच्या कार्यक्रमात माधुरी दीक्षितला पाहून रितेश देशमुखने वाकून केला नमस्कार, मराठमोळ्या अभिनेत्याच्या संस्कारांचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

देवोलीनाने पुढे लिहिले की, “तुम्हाला जे हवे ते करा. दोनवर का थांबायचे? दोन, चार किंवा पाच विवाह करा. हा आजार समाजात पसरवू नका. मी सांगितलेला प्रत्येक शब्द अभिप्रेत आहे आणि मी अजूनही त्यावर ठाम आहे. आणि तरीही, लोक माझ्यावर YouTube कंटेंट बनवत आहेत ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. कृपया आदर करा. माझा नवरा मुस्लीम असूनही तो आपल्या पत्नीशी खूप निष्ठावान आहे, त्याला बहुपत्नीत्वात अजिबात रस नाही आणि हे समजायला आम्हाला चार वर्षे लागली आणि मग आम्ही लग्न केले. फक्त सात दिवसात नाही”.

आणखी वाचा – कुशल बद्रिकेचा हिंदी कॉमेडी शो प्रेक्षकांचा निरोप घेणार, म्हणाला, “हिंदी म्हणजे आयुष्यातील मोठी संधी नसून…”

देवोलीनाने पुढे लिहिले की, “स्त्रीच्या स्वाभिमानाशी तडजोड केली जाऊ नये. पण तुझ्या भावना मी समजू शकते. मला माहित आहे तुला ते समजू शकत नाही. प्रामाणिकपणे मला तुमच्याबद्दल वाईट वाटते. पण मग मला वाटतं हे बघून तुला तुझं लग्न असंच व्हावं असं वाटत होतं”, असं म्हणत पायलला उत्तर दिलं आहे.

Tags: arman malik wifeDevoleena BhattacharjeeDevoleena Bhattacharjee On Payal Malikpayal malik
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
07 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

'सिंह' राशीच्या लोकांना नोकरीत बढती तर 'वृषभ' राशीच्या लोकांना व्यवसायात नफा, आजचा दिवस नेमका कसा? जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.