शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बायकोच्या प्रेमापोटी टेकडी चढून…”, फिरायला गेल्यानंतर उमेश कामत असं का म्हणाला?, फोटो शेअर करत सांगितलं, “वर पोहोचताच…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 3, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Umesh Kamat shared Scotland photos

“बायकोच्या प्रेमापोटी टेकडी चढून…", फिरायला गेल्यानंतर उमेश कामत असं का म्हणाला?, फोटो शेअर करत सांगितलं, "वर पोहोचताच…"

मराठी मालिकाविश्व, रंगभूमी, तसेच चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे उमेश कामत. उमेशने आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. उमेशसह त्याची बायको म्हणजेच अभिनेत्री प्रिया बापट हे दोघे मराठी कलाविश्वातील क्युट जोडी म्हणून बरेच लोकप्रिय आहेत. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेली ही जोडी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर अनेक रिल्स व फोटो शेअर करतात. सोशल मीडियावर हे दोघे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.  

उमेशही त्याच्या सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रिया-उमेश सध्या त्यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगानिमित्त लंडनला गेले आहेत. लंडनमध्ये ते त्यांच्या नाटकाशिवाय फिरण्याचाही आनंद घेत आहेत. त्यामुळे लंडनमधील खास ठिकाणी हे दोघे फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. अशातच उमेशने लंडनमधील काही खास फोटो शेअर केले असून या फोटोखाली लिहीलेल्या कॅप्शनने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

आणखी वाचा – नम्रता संभेरावने जुन्नरमधील गावात बांधलं हक्काचं घर, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

उमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरील लंडनमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो एका उंच टेकडीवर उभा आहे आणि त्याच्यामागे लंडनचा निसर्गरम्य नजारा पाहायला मिळत आहे. हे खास फोटो शेअर करत उमेशने असं म्हटलं आहे की, “बायकोच्या प्रेमापोटी टेकडी चढून गेलो आणि वर पोहोचताच त्या नजाऱ्याच्या प्रेमात पडलो”. उमेशने शेअर केलेल्या या फोटोला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Video : पडद्यामागे तबला वाजवू लागले अरुण कदम, नाटकाच्या प्रयोगापूर्वी बॅकस्टेज धमाल, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, शांत स्वभाव, समजूतदारपणा व सहज सुंदर अभिनय करत उमेशने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे. तसेच चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. उमेश नुकताच ‘मायलेक’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याचबरोबर त्याचे सध्या रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सुरु आहे. या नाटकालाही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.   

Tags: marathi actormarathi entertainment newsumesh kamat
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
04 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

गुरुवारी मिथुन व कन्या राशींचे भाग्य उजळणार,नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार, व्यवसायातही होणार लाभ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.