शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जावईबापूंचा मानपान, सासू-सासऱ्यांची खास तयारी अन्…; सासरवाडीत प्रथमेश परबचे लाड, पत्नीने शेअर केले खास फोटो   

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 3, 2024 | 11:28 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab's wife left home for the first time after marriage and she expressed her feelings through a special post on social media.

जावईबापूंचा मानपान, सासू-सासऱ्यांची खास तयारी अन्...; सासरवाडीत प्रथमेश परबचे लाड, पत्नीने शेअर केले खास फोटो   

‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परबने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक विनोदी व इतर भूमिकांनी प्रथमेशने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक चित्रपटांमधून प्रथमेश नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावरटो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. तसेच तो त्याच्या पत्नीबरोबरचेही काही खास फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच प्रथमेशने प्रियसी क्षितिजा घोसाळकरबरोबर विवाहगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी चांगलीच चर्चेत आहे.

प्रथमेश व क्षितिजा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच हे दोघे नुकतेच क्षितिजाच्या माहेरी म्हणजेच श्रीवर्धन येथे गेले होते. यावेळी दोघांनी निसर्गाच्या सानिध्यात मनमुरादपणे आनंद लुटला. याचे काही खास क्षणही त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. क्षितिजाने लग्नानंतर पाहिल्यांदाच माहेरी गेली होती. त्यामुळे तिच्यासाठी हे माहेरपण खूपच खास होते आणि याच खास भावना तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar Parab (@miles_in_style)

क्षितिजाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “लग्नाच्या पाच महिन्यांनंतर, मी आणि माझे पती श्रीवर्धनमध्ये माझ्या माहेरी आलो आणि ही माझ्यासाठी एक कमालीची भावनिक होती. कारण लग्नानंतर माझ्या गावी परतण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. या घराचा प्रत्येक कोपरा माझ्या बालपणीच्या आठवणी घेऊन आला. तरीही सर्व काही वेगळे आणि सारखेच वाटत होते”.

आणखी वाचा – Video : “जाड आहे या गोष्टीचा…”, विशाखा सुभेदारांच्या ‘त्या’ व्हिडीओची चर्चा, नेटकरीही कमेंट करत म्हणाले, “तुम्ही जशा आहात…”

यापुढे तिने असं म्हटलं की, “घराच्या दारातून चालत, त्याच खोल्यांमध्ये बसणे, आणि माझ्याशेजारी माझ्या जोडीदाराबरोबर त्याच दृश्यांचा आनंद घेणं म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानाचा सुंदर मिलाप होता. समुद्राच्या मंद वाऱ्यापासून ते स्थानिक संस्कृतीपर्यंत आणि माझ्या हृदयाजवळच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या नवीन आठवणी निर्माण केल्या”.

आणखी वाचा – ‘ते’ सांकेतिक वाक्य रुपालीला समजणार, विरोचकाविरुद्ध विणलेल्या जाळ्यात राजाध्यक्ष स्वतःच अडकणार, नेत्रा वाचवू शकेल का?

तसेच यापुढे तिने कृतज्ञतेची भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “ही भेट म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान यांचा सुंदर मिलाफ होता, कुटुंबाच्या अखंड प्रेमाचा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर केल्याचा आनंद काही वेगळाच असतो. या मौल्यवान क्षणांसाठी आणि माझ्या पतीबरोबर माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे”.

Tags: kshitija ghosalkarmarathi entertainment newsprathamesh parab
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ambani Family Is Getting Mass Wedding

दागिने, इतक्या लाखांचा चेक अन्…; अंबानी कुटुंबाकडून सामूहिक विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, ५० गरीब जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.