शत्रुघ्न सिन्हा यांनी लेक सोनाक्षी सिन्हाचा अगदी शाही थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. झहीर इक्बालबरोबर सोनाक्षीने लग्न केले. बॉलिवूडमध्ये बरेच दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरु होती. दरम्यान लग्नाबाबत कुटुंबात मतभेद असतानाही सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी या नात्याला होकार दिला. २३ जून रोजी झहीर इक्बाल व सोनाक्षीने त्यांच्या सात वर्षांच्या नात्याला नवीन नाव दिले आणि कायमचे ते एकत्र आले. पण, लेकीच्या लग्नानंतर काही दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. या बातमीने त्यांच्या चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Shatrughan Sinha Health Update)
शुक्रवारी (२९ जून) रात्री उशिरा सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले. त्यानंतर सोनाक्षी आई होणार असल्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान, अभिनेत्रीचे पती झहीर इक्बालने वडील शत्रुघ्न सिन्हा यांची विचारपूस करण्यासाठी आल्याचा खुलासा केला. ७७ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांना काय झाले आहे?, त्यांना दवाखान्यात का दाखल केले आहे?, झहीरबरोबर मुलीचे लग्न झाल्यानंतर लगेचच शत्रुघ्न यांच्या तब्येतीचे काय झाले?, अशा प्रश्नांनी चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.
‘TOI ‘च्या रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. असे म्हटले जात आहे की, पहिली लोकसभा निवडणूक आणि नंतर झहीरचे मुलगी सोनाक्षीबरोबरचे लग्न यादरम्यान ते खूप धावपळ करत होता, ज्यामुळे त्याच्या शरीरावर व मनावर खूप दबाव आला होता. त्यामुळे त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, काळजी करण्याची गरज नाही, ते पूर्णपणे ठीक आहेत.
शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी सोनाक्षीला मिळताच तिने घाईघाईने पती झहीर इक्बालसह वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कोकिलाबेन हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पापराजींनी त्यांना पाहिले, परंतु त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केला.