बहिणी बहिंणीमधील बॉण्ड हे खूपच स्पेशल असतं.बहिणी जितक्या एकमेकींवर प्रेम करतात,तितकंच त्यांच्यात नेहमी वाद देखील होतात. पण कितीही वाद झाले तरीही बहिणींचं एकमेकींवर जीवापाड प्रेम असतं.असंच प्रेम सिनेसृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेत्री गौतमी देशपांडेमध्ये पाहायला मिळतं. यांना मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणून ओळखलं जातं.सोशल मीडियावर त्या दोघी अनेक भांडणाचे व्हिडीओ शेअर करत असतात,हे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरतात.ते जेवढेच वाद करतात तेवढेच एकमेकांवर प्रेम देखील व्यक्त करतात. तर आता देखील मृण्मयीच्या एका फोटोवर गौतमीने भन्नाट कमेंट केलेली पाहायला मिळते.(mrunmayee gautami)
नक्की काय म्हणाली गौतमी?
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केलाय. यात तिने पिवळ्या रंगाचा फ्लॉवर प्रिंटेड टॉप घातलाय. तसेच तिने ही पोचले महाबळेश्वर ला..असं सांगितलं.तर तिची ही पोस्ट पाहून गौतमीने त्वरित एक भन्नाट कमेंट केलीय. ढाप अजून माझे कपडे आणि म्हण मी गेल्या दोन वर्षात एक नवीन कपडा नाही घेतला.असं म्हणत तिने राग व्यक्त केलाय.तेव्हापासून मृण्मयीच्या या पोस्टपेक्षा गौतमीच्या या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधलं.तसेच तिच्या या कमेंटवर रिप्ल्याय म्हणून अनेक चाहत्यांनी हास्याचा वर्षाव केलाय.या आधीदेखील मृणाल आणि गौतमी सोशल मीडियावर अनेकदा वाद घालताना दिसून आलेत.यांचे हे वाद पालकांपर्यंत देखील जातात. पण त्यांचे हे वाद चाहते एन्जॉय करत असतात.त्यांचा हा बॉण्ड पाहून अनेक बहिणी देखील त्यांच्या आठवणी कमेंटमध्ये सांगत असतात.

यासोबतच मृण्मयी गौतमीला दत्तक घेतलेली मुलगी आहे असं अनेकदा म्हणत असते.यादरम्यान महाबळेश्वरला पोहोचल्याचा उल्लेख मृण्मयीने या पोस्टमध्ये केला आहे, तर याठिकाणी तिचे ड्रीम होम म्हणजे फार्महाउस आहे. तेथे शेतीसांबांधी अनेक उपक्रम राबवतात.हे घर त्यांनी स्वतः उभारलं आहे.त्याचे फोटो देखील मृणालने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले.(mrunmayee gautami)
हे देखील वाचा: सानिया आणि वैदेहीचंऑफस्क्रीन ट्विनिंग
काही महिन्यांपूर्वीपूर्वी मृण्मयीचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.या चित्रपटातील मृण्मयीच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. तर मृण्मयी आता प्रेक्षकांसमोर कोणती भूमिका घेऊन येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झालेत.याआधी मृण्मयीनं मोकळा श्वास,नटसम्राट,आंधळी कोशिंबीर,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांंमध्ये काम केलं आहे.
