‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली डायरी लिहित अर्जुनच्या आठवणीत रमून जाते. त्यांनतर प्रिया लपवून किल्ल्या घेऊन अर्जुनच्या कॅबिन बाहेर येते आणि गोरे बाईंना किल्ल्यांचे छाप साबनावर मारुन आणायला सांगते. गोरे बाई हे काम करायला जातात. त्यांनतर प्रिया मी संध्याकाळी येते फाईल घ्यायला. तुम्ही या किल्ल्या अर्जुनच्या टेबलखाली टाका असं गोरे बाईंना सांगून तिथून निघते. तेव्हा सायलीचा कॉल अर्जुनला येतो. अर्जुन कॉलवर बोलत असतो. तेव्हा चैतन्य प्रिया कॅबिनमध्ये आहे हे दाखवतो. (Tharal Tar Mag Serial Update)
अर्जुन प्रियाकडे बघतो तेव्हा प्रिया मी निघते असं बोलून निघून जाते. तर प्रियाचा हा आवाज सायली ऐकते. आणि सायली अर्जुनला विचारते प्रिया ऑफिसमध्ये का आली आहे. दुसरीकडे महिपत पवार वकिलला घरी बोलवून साक्षी या केस मधून बाहेर कशी पडणार? असं विचारतात. तेव्हा माहिती नाही पण साक्षी मॅडम मर्डर झाला तेव्हा दोन तास आश्रमात नव्हत्या याचे पुरावे लागतील, असं म्हणतो. तेव्हा महीपत बंदूक दाखवून त्यांना धमकी देतात तेव्हा पवार वकील घाबरतात.
तर दुसरीकडे अर्जुन घरी येतो तेव्हा सायली प्रिया ऑफिस मध्ये का आली होती असं विचारते. तेव्हा माहीत नाही पण तिने मला मिठी पण मारली असं अर्जुन सांगतो. हे ऐकून सायलीला राग येतो. पण त्यावेळी प्रिया ऑफिसमध्ये मुद्दाम आली होती. ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे असं म्हणत तो आणि सायली ऑफिसला निघतात. ऑफिसला पोहचल्यावर त्याला चावी आपल्याकडे नाही हे जाणवतं तर सायलीला चावी मिळते. तर प्रिया रविराजला फसवून ऑफिसला पोहचते. त्यावेळी सायली अर्जुन ऑफिसच्या जुन्या आठवणीत रमतात. सायली अर्जुनला कॉफी बनवून देते. आणि प्रिया या दोघांपासून लपत अर्जुनच्या कॅबिनजवळ पोहचते.
तर पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रियाला सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळते. आणि सायली पुन्हा फाईल बघायला जाते. तेव्हा ती फाईल नाही हे पाहून घाबरते. आता प्रिया हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य सर्वांसमोर उघड करणार का?, की सायली-अर्जुन प्रियाला शोधणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.