‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने प्रतिबिंब शक्तीने केतकी काकूचे प्रतिबिंब तयार केले होते आणि त्या प्रतिबिंबच्या मदतीने तिने नेत्राकडून अस्तिकट्यारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अशातच आजच्या भागात फाल्गुनी केतकीकाकूच्या प्रतिबिंबला पाहून गोंधळून गेलेली पाहायला मिळाली. केतकी काकूच्या प्रतिबिंबाने तिच्याबरोबर केलेलं वर्तन हे खऱ्या केतकी काकूनेच केलं आहे असं समजुन ती केतकी काकूची माफीदेखील मागते. मात्र खऱ्या केतकी काकूला फाल्गुनी असं का वागत आहे तेच कळत नाही.
इतक्यात अद्वैत नेत्राला फोन करुन इंद्राणीच्या खोलीत अस्तिकट्यार संदर्भात बोलण्यासाठी बोलावतो. त्यानंतर नेत्रा तिच्या भिंग घेऊन अस्तिकट्यारवर काही संकेत, श्लोक लिहिला असेल का हे तपासते. मात्र तिला तसं काहीच मिळत नाही. यादरम्यान नेत्रा, इंद्राणी व अद्वैत यांच्यात विरोचकाला कोणती तरी शक्ती मिळाली असल्याची चर्चा होते. मात्र ही शक्ती कोणती आहे? हे त्यांना माहीत नसल्यामुळे ते काळजी करत असतात.
इतक्यात तिथे केतकी काकू येतात आणि ते फाल्गुनीच्या विचित्र वागण्याचा विरोचकाशी काही संबंध असल्याचे म्हणतात. तेव्हा नेत्रा त्यांना तशी शक्यता असू शकते असे म्हणते. तेव्हा इंद्राणी व अद्वैत फाल्गुनीवर नजर ठेवण्याविषयीही बोलतात. त्यानंतर रुपालीच्या स्वप्नात विरोचक येतो आणि तो तिला अस्तिकट्यार शोधण्यासाठी सावध करतो. अस्तिकट्यार शोधली नाही तर तिला कायमचं झोपावं लागेल असंही तो तिला म्हणतो. त्यानंतर रुपाली जागी होऊन अस्तिकट्यार शोधायला हवी असं म्हणत प्रतिबिंब शक्तीचा इंद्राणीवर वापर करण्याचा विचार करते. तेव्हा इंद्राणी प्रतिबिंब शक्तीचा वापर करण्यासाठी श्लोक उच्चारत असताना तिथे शेखर येतो. त्याला बघून रुपाली शांत बसते. मात्र त्याला संशय येतो.
आणखी वाचा – वृषभ, सिंह व तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस लाभदायी, सर्व मनोकामना होतील पूर्ण, जाणून घ्या…
शेखर हीच गोष्ट नेत्रा अद्वैत व इंद्राणी यांना सांगतो. तेव्हा नेत्रा शेखरला रुपालीने कोणत्या मंत्राचा जप केला असं विचारते. तेव्हा शेखर तो मंत्र सांगत असताना यक्षणाय: असं म्हणतो आणि तो शब्द म्हणताच त्याच्या डोळ्यातून रक्त येऊ लागते. त्यानंतर सगळेच काळजीत पडतात. तेव्हा ते सगळे सावध होतात आणि इंद्राणीलाही कळते1की विरोचक श्लोकाचे वाचन करत असताना तिथे शेखर गेल्यामुळे त्याच्या डोळ्यातून रक्त वाहू लागते. पुढे फाल्गुनी तन्मयशी फोन वर बोलत असताना सगळे तिला इग्नोर करत आहेत असं वाटून ती हताश होते. तेव्हा तिथे केतकी काकू येतात आणि त्या तिची समजूत काढतात. तेव्हा त्या रुपालीविरुद्ध आपण जे नाटक करत आहोत ते तिला कळता कामा नये असंही म्हणतात आणि हीच गोष्ट रुपाली ऐकते.
आणखी वाचा – “कोणाची औकात आहे का?”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा दिग्दर्शकांना थेट सवाल, म्हणाला, “कोण आहात तुम्ही?”
त्यानंतर रुपाली आपल्या खोलीत जाऊन यांचा बदला घेण्याविषयी बोलते. तेव्हाच ती युद्ध पुकारण्याची आता वेळ आली असल्याचेही मनातल्या मनात म्हणते. त्यामुळे आता विरोचक नक्की काय करणार? राजाध्यक्ष कुटुंबीय विरोचकाला कसे सामोरे जाणार? तसेच नेत्रा विरोचकाला मारु शकेल का? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.