बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. गेले काही दिवस तिच्या लग्नाबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या आणि अखेर ती बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते.
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सात वर्षे डेटिंग केल्यानंतर काल दोघांनी लग्न केले. मात्र, हा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा धर्म. सोनाक्षी व झहीर दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. सोनाक्षी सिन्हा हिंदू आहे, तर झहीर हा मुस्लिम आहे. त्यामुळे दोघे त्यांच्या धर्मावरुन अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र, दोघांनीही आपापल्या धर्माला प्रेमाच्या आड येऊ दिले नाही. या दोघांनी २३ जून रोजी विशेष विवाह कायद्यांतर्गत दोघांनी न्यायालयात लग्न केले.
शत्रुघ्न सिन्हा की बेटी और ऐक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा ने जहीर इकबाल से शादी रचाई है। इसके बाद हिंदू शिव भवानी सेना ने पटना में पोस्टर लगाकर विरोध जताया है। इसमें लिखा गया है- शत्रुघ्न सिन्हा की बेटी को बिहार में घुसने नहीं देंगे। #sonakhisinha #zaheerIqbal #shatrughansinha pic.twitter.com/AN9LAajqvn
— SANTOSH PANDEY (गया बिहार) (@Santosh53172026) June 24, 2024
सोनाक्षी व झहीर यांचे लग्न पार पडल्यानंतर आता सोनाक्षी सिन्हाला धमक्या येत आहेत. अभिनेत्रीविरोधात धमकीच्या पोस्ट करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे, ज्याद्वारे अभिनेत्रीला धमकी देण्यात आली आहे. तसेच यात सोनाक्षीला बिहारमध्ये येऊ दिले जाणार नाही, असे लिहिले आहे. तसेच या पोस्टरद्वारे सोनाक्षी व शत्रुघ्नविरोधात हिंदू शिव भवानी सेनेने सोनाक्षी-झहीरच्या लग्नाला लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे लग्न असं म्हटलं आहे.
संतोष पांडे नावाच्या एका नेटकऱ्याने एक्स (पूर्वीचे ट्विस्ट)वर एक पोस्टर शेअर केले आहे आणि या पोस्टमध्ये त्याने असं लिहिले आहे की, “सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचे लग्न हे लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे आहे. संपूर्ण देशाचे इस्लामीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा. अन्यथा आपल्या मुलांचे लव, कुश हे नाव आणि ‘रामायण’ हे घराचे नाव बदलावे. हा हिंदू धर्माचा अपमान आहे”.
आणखी वाचा – “दिवसाला ६० सिगारेट आणि दारु…”, व्यसनाच्या आहारी गेलेले नाना पाटेकर, म्हणाले, “वासामुळे माझ्या गाडीत…”
तसेच यापुढे यात असं म्हटलं आहे की, “हिंदू धर्माला कमकुवत आणि हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने सोनाक्षीचे लग्न धर्माच्या नावाखाली धार्मिक कट आणि बेकायदेशीर धर्मांतर आहे. यामुळे लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळत असून संपूर्ण देशाचे इस्लामीकरण करण्याचा हा एक प्रयत्न आहे”.