‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेच्या हटके कथानकामुळे ही मालिका लोकप्रिय झाली आहे. मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तो हृषिकेश रणदिवे हे पात्र साकारत आहे. उच्च विचारी, सुसंस्कारी, नेहमीच मदतीला धावून जाणाऱ्या अशा एका पात्राची तो भूमिका साकारत आहे. या मालिकेआधी सुमित ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत दिसला होता. या मालिकेमुळे सुमित खऱ्या अथाने घराघरांत पोहोचला. (Sumeet Pusavale wife)
सुमित सोशल मिडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. खऱ्या आयुष्यामुळेही तो चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. सुमितने १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्न केले. बायकोबरोबरचे अनेक फोटो तो नेहमीच शेअर करताना दिसतो. सुमीतच्या पत्नीचं नाव मोनिका महाजन असे आहे. सुमितबरोबर अनेकदा ती स्पॉट होतानाही दिसली आहे. दिसायला सुंदर असणाऱ्या सुमितच्या पत्नीचा आज वाढदिवस आहे.
बायकोसाठी खास पोस्ट शेअर करत, त्याने “वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा बायको. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात परत परत येवो, तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहू दे. तसं बघायला गेलं तर तुझ्याबरोबरचा प्रत्येक दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो पण आजचा दिवस खास आहे कारण याच दिवसामुळे मला माझं प्रेम मिळालं आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बायको. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”, असं म्हटलं आहे.
सुमीतची पत्नी मोनिकाही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बायकोच्या खास वाढदिवसानिमित्त सुमितने चित्रीकरणातून ब्रेक घेत गोवा गाठलं आहे. सध्या तो गोवा येथे एन्जॉय करताना दिसत आहेत.