झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेमाचे काही खास क्षण पाहायला मिळाले. नुकतीच अक्षराने अधीपतीला तिच्या प्रेमाची कबुलीदेखील दिली. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसलं. मात्र ही गोष्ट भुवनेश्वरीलं काही पटली नाही आणि तिने या दोघांना नुकतेच घराबाहेर काढले.
भुवनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांना सुर्यवंशी घराण्याच्या रितीनुसार, खऱ्या संसाराला सुरुवात व्हायच्या आधी नवरा-बायकोने अंगावरील कपड्याबरोबर दहा दिवस घराबाहेर राहायचं, सूर्यवंशी घराण्याची ओळख न सांगता सगळ्या अटी पाळून, एकमेकांची साथ न सोडता बाहेरच्या जगात नीट राहू शकले तर त्यांचा संसार सुखाचा होतो असं म्हणून घराबाहेर पडायला भाग पाडले. यानंतर अधिपती व अक्षरा यांनी त्यांच्या नव्या संसारालाही सुरुवात केली आहे.
अशातच घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या नात्यात आणखी जवळीक येत आहे. घराच्या बाहेर अधिपती-अक्षरा अगदी सुखाने नांदत आहेत आणि त्यांच्यातील याच खास क्षणांची झलक सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे अधिपती-अक्षरा यांचे काही खास प्रोमो शेअर करण्यात आले असून यातील एक प्रोमो सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, “झहीरबरोबर ती…”
या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा अधिपतीला “तुम्ही माझ्याबरोबर असताना मला कसली भीती वाटणार” असं म्हणत अधिपतीला तुम्हाला भीती वाटत आहे का?” असं विचारते. यापुढे अधिपती “तुम्ही माझ्याबरोबर असताना मला भीती वाटत नाही मग मला तुमच्याबरोबर असताना भीती का वाटेल” असं म्हणतो. यापुढे तो “तुमच्याबरोबर कुठेही यायला तयार आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, जंगलात, समुद्रात, वाळवंटात, आकाशात किंवा हिमालयात कुठेही यायला मी तयार आहे” असं म्हणतो.
आणखी वाचा – “आता इंग्रजी गाणी का गाते?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर केतकी माटेगावकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “मराठी गाणी…”
पुढे अधिपती “अरे संसार… संसार…” असं म्हणत अक्षराचा हात हातात घेत “चला की मंडळी” असं म्हणतो. पुढे अक्षराही अधिपतीच्या हातात हात देत “चला की धनी” असं म्हणते. दरम्यान, अधिपती त्यांच्यातील ही केमिस्ट्री सध्या चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात केली असून त्यांचा हा नवीन प्रवास चाहत्यांनाही भलताच आवडत आहे.