बॉलीवुड अभिनेता अनिल कपूर हा नेहमी चर्चेत असतो. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ८० व ९०चं दशक त्यांनी गाजवले आहे.आता ते ‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. या शोसाठी ते खूप उत्सुक आहेत. ते अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते जरीही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसले नाहीत तरीही त्यांना मनोरंजनसृष्टीमध्ये अजूनही काम मिळत आहे. ते आता ‘बिग बॉस’च्या निमित्ताने नवीन रुपात पाहायला मिळणार आहे. (anil kapoor on fitness)
अनिल हे त्यांच्या खासगी आयुष्यात साधे आणि शिस्तीचे जीवन जगतात. आताच नाही तर खूप वर्षांपासूनच आपल्या तब्येतीची काळजी घेताना दिसतात. दरवेळी कॅमेराससमोर असल्याने चांगले दिसणे गरजेचे आहे. अनिल आज ६७ वर्षांचे आहेत मात्र ते अवघ्या ४० वर्षांचे दिसतात. एकदा त्यांनी आपल्या तरुण्याचे गुपित सांगितले आहे.
अनिल यांनी सांगितले की, “माझ्या घरी लोक येतात, पार्टी करतात. या पार्टी सकाळपर्यंत सुरु असतात. मात्र मी लवकर झोपयायचो”. एकदा अनिल ‘आप की अदालत’ या कार्यक्रमामध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, “माझ्या घरी खूप लोक कधी कधी पार्टीसाठी यायचे. मोठे कलाकार मंडळी असायचे. मी त्यांचं नाव घेणार नाही. पण मी लवकर ११ वाजताच झोपून जायचो. मला खूप झोप यायची. मी झोपून जायचो. सकाळी लवकर उठून मी शूटवर निघून जायचो”.
पुढे ते म्हणाले की, “मला वाटतं की झोप खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही नेहमी कॅमेरासमोर असता. जर तुम्ही व्यवस्थित झोप घेतलीत तर तुम्ही ताजेतवाने राहाल. व्यायाम करु शकाल. कामामध्ये व्यवस्थित लक्ष लागेल. जर तुम्ही रात्रभर जागलात, सिगरेट प्यायलात, दारू प्यायलात तर सकाळी तुमच्या चेहऱ्यावर दिसून येणारच आहे. मी सुरुवातीच्या काळात खूप आळशी होतो. पार्ट्या करायचो. पण नंतर मला वाटलं की खूप काम करायचं असेल तर या सर्व गोष्टी सोडाव्याच लागतील”.
अनिल यांच्या या सवयीमुळे ते आजही खूप तरुण दिसत आहेत. त्यांच्या या सवयी तरुणांनीदेखील आत्मसात कराव्यात असेही त्यांना वाटते.