दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी दिलेले योगदान हे अमूल्य आहे. बहुरंगी व्यक्तीमत्व असलेल्या दादा कोंडके यांना महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले आहे. दादा कोंडके यांच्या कॉमेडीचा दबदबा आजही तसाच आहे. त्यांचे चित्रपट पाहताना प्रेक्षक आजही लोटपोट हसतात आणि त्यांच्या चित्रपटाचे किस्से आजही लोकांमध्ये प्रचलित आहेत. असाच ‘आगे की सोच’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा रझा मुराद यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला.
यावेळी रझा मुराद यांनी असं म्हटले की, “‘आगे की सोच’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दादा कोंडके यांनी मला महाराष्ट्रीयन पद्धतीची पिवळी बटाट्याची भाजी खायला घातली होती. त्या चवीने माझ्या मनात महाराष्ट्राची आठवण कायमची कोरली गेली. दादा कोंडके यांच्या साधेपणाने आणि प्रेमाने मी मंत्रमुग्ध झालो होतो. त्यांच्या सहवासात काम करणे ही एक अविस्मरणीय अनुभव होता”.

आणखी वाचा – नेत्राच्या बाळाला जीवे मारण्यात विरोचक यशस्वी होणार का? नेमका कुणाचा बळी जाणार? मालिकेला नवं वळण
हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आजही या चित्रपटातील प्रत्येक सीन चाहत्यांच्या मनात कायमचा कोरला गेलेला आहे. गणपत नावाच्या साध्या आणि प्रामाणिक माणसाची कथा या चित्रपटात दादा कोंडके यांनी अप्रतिम पद्धतीने मांडली. ३५ वर्षांपूर्वी आलेला ‘आगे की सोच’ हा चित्रपट येत्या २३ जून रोजी पुन्हा एकदा झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हिंदी ऑडिओसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा – अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी, रोख रक्कमेसह काही वस्तू लंपास, अभिनेत्याने व्हिडीओद्वारे दाखवलं सत्य
दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांनीही तितक्याच ताकदीने हसवले आहे. त्यामुळे दादा कोंडके यांचे मराठीसह हिंदी चित्रपटांचेही अनेक चाहते आहेत. अशातच झी टॉकीज वाहिनी दादा कोंडके यांच्या हिंदी चित्रपटांचे प्रीमियरसुद्धा प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांनाही दादा कोंडके यांच्या विनोदी शैलीचा आनंद लुटता येईल. तर, या रविवारी म्हणजेच २३ जून रोजी दादा कोंडके यांच्या आगे की सोच’ या चित्रपटातून प्रेक्षकांना निखळ विनोदाचा आनंद लुटता येणार आहे.