अभिनेत्री करीना कपूर व सैफ अली खानचा मोठा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडियावर बरेचदा चर्चेत असतो. एक काळ असा होता की तैमूरची एक झलक पाहण्यासाठी चाहते बेचैन झालेले असायचे. तैमूर पापाराझींचा आवडता स्टार किड होता, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तैमूरचा जन्म डिसेंबर २०१६मध्ये झाला होता. तैमूरच्या जन्मापासून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता एका प्रसिद्ध पापाराझीने यूट्यूबरशी बोलताना तैमूरच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. (Taimur Ali Khan Photos)
तैमुरबाबत बोलताना तो म्हणाला, “आम्ही तैमूरला करीना व सैफच्या घराबाहेर पाहायचो. करिनाला काही आक्षेप नव्हता. मागणी वाढली होती, काय करायचे?, हा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही त्याला चोवीस तास फॉलो करायला सुरुवात केली. तो शाळेत जात असेल तर ते त्याच्या मागे जात. ट्यूशनला जात असेल तर आम्ही त्याच्या ट्युशनकडे जात असू. तो खेळत असताना त्याचे फोटो काढायचो. आम्ही त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याला त्रास देऊ लागलो होतो. त्यानंतर शाळा, शिकवणी अशा काही ठिकाणी तुम्ही येऊ नका, अशी विनंती त्याच्या पालकांकडून करण्यात आली”.
पापाराझी पुढे म्हणाला, “एकदा तैमूर त्याच्या ट्यूशनला जात होता आणि मी पाहिले की ४०-५० लोक बाईकवर त्याच्या मागे येत होते. मी विचार केला की हे ५० लोक कुठून आले?. त्यावेळी मागून मला कोणीतरी बोलले की, पुढे गर्दी पहा. पुढे पाहिलं तर कोणीतरी गेटवरुन उडी मारत होतं तर कोणी त्याच्यावर हल्ला करणार असल्यासारखे त्याच्या गाडीभोवती आले. मी घाबरलो आणि विचार केला की नाही यार, हे चुकीचे आहे. जर मी इतका घाबरलो तर त्याच्या कुटुंबाला कसे वाटले असेल याची कल्पना करा. तैमूरला सांभाळणाऱ्या आयाही काळजी करु लागल्या. सैफने आम्हाला फोन करुन तैमूरच्या शाळेजवळ न जाण्याची विनंती केली. मग आम्ही त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला आणि मर्यादा निश्चित केल्या. त्याचं वैयक्तिक आयुष्यही आहे, ही गोष्ट विसरुन चालणार नाही”.
करीना व सैफने २०१२ मध्ये लग्न केल्याची माहिती आहे. या लग्नापासून दोघांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचे नाव तैमूर आणि लहान मुलाचे नाव जेह असे आहे.