‘हिरामंडी’ या सीरिजमुळे व स्वत:च्या लग्नामुळे सध्या सोनाक्षी सिन्हा ही चांगलीच चर्चेत आहे. लवकरच अभिनेत्री प्रियकर झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री येत्या २३ जून रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने अद्याप त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर केले नसले तरी अनेक कलाकारांनी सोनाक्षी-झहीरचे लग्न होणार असल्याबद्दल सांगितले आहे.
सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या विधींनादेखील सुरुवात झाली आहे. सोमवारी, या जोडप्याने बॅचलर पार्टीचा आनंद लुटला, ज्याचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरदेखील शेअर केले. आता सोनाक्षी-झहीरच्या प्री-वेडिंग फंक्शनची माहितीही आली आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, एका सूत्राकडून माहिती मिळाली आहे की हे उद्या म्हणजेच २० जून रोजी सोनाक्षी-झहीरचा हळदी सोहळा पार पडणार आहे.
सोनाक्षीच्या बांद्रा येथील नवीन घरात तिचं हळदी सोहळा होणार आहे. सोनाक्षीच्या पालकांनी हे घर सोडल्यानंतर स्वत: सोनाक्षीने हे घर खरेदी केले आहे. या सोहळ्यासाठी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील आणि या सोहळ्यासाठी ५० पेक्षा कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हळदी सोहळ्यासाठी सोनाक्षीने तिच्या स्वत:च्या नवीन घराची निवड केली आहे.
सोनाक्षी-झहीरने यांना त्यांचे लग्न अत्यंत खाजगी ठेवायचे होते. तरीदेखील ते लवकरच एका मोठ्या पार्टीचेही आयोजन करणार आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी शिल्पा शेट्टीचे मुंबईमधील एक रेस्टॉरंट निवडले आहे. IANSच्या वृत्तानुसार, सोनाक्षी-झहीर त्यांच्या लग्नात पांढऱ्या थीमचे कपडे परिधान करणार आहेत. तथापि, त्यांच्या लग्नातील जेवणाबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नसली तरी अनेकजण या लग्नाची वाट बघत आहेत.
दरम्यान, आज १९ जून रोजी सोनाक्षी व झहीर यांचा संगीत सोहळा आहे, तर उदय त्यांचा हळदी सोहळा पार पडणार आहे. तसेच २२ जूनला त्यांचा साखरपुडा होणार असून त्यानंतर २३ जून रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.