‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, इकडे सायलीची वाटपौर्णिमेसाठीची लगबग सुरू झालेली असते. अगदी पारंपरिक अंदाजात ती पूजेसाठी तयार होते. अर्जुनही सायलीसाठी वटपौर्णिमेनिमित्त उपवास करायचे ठरवतो. अर्जुन सायलीच्या विचारात हरवलेला असताना चैतन्य त्याला भानावर आणतो. दुसरीकडे प्रिया मुद्दाम रविराजसमोर प्रतिमाची साडी नेसून येऊन उगाच साळसूतपणाचा आव आणून दाखवते. पण रविराज काही तिला फारसा भाव देत नाही आणि वटपौर्णिमेची पूजा विवाहित बायका करतात असं सांगून तिथून निघून जातो. (Tharal Tar Mag Serial Update)
शिवाय लवकरच तुझं लग्न लावून देणार असल्याचेही सांगतो. रविराजने प्रतिमाच्या साडीकडे दुर्लक्ष केल्याने प्रियाचा जळफळाट होतो. इथे घरी अर्जुनचा पाय काही केल्या ऑफिसला जायला निघत नसल्याने तो घरातच घुटमळत राहतो. त्याला शेवटी चैतन्य व कल्पना समजवतात. अर्जुन मात्र सायलीकडे पूजेची तयारी करण्याबद्दल इच्छा व्यक्त करतो. आणि सांगतो पाणीही न पिता माझ्या बायकोने माझ्यासाठी उपवास केला आहे, तर मी एवढं नक्कीच करू शकतो.
आणखी वाचा – आदित्यसाठी पारू करणार वडाची पूजा, दिशा-दामिनीसमोर येणार का सत्य?, मालिकेत रंजक ट्विस्ट
अर्जुन सायलीला पूजेची सर्व तयारी करुन देतो आणि अश्विन त्याचे फोटो काढतो. पण तेवढ्यात प्रताप सरप्राइज देत तिथे येतो. अर्जुनला मागच्या वाटपौर्णिमेला सायलीला चक्कर आल्याची आठवण येते. त्यामुळे आधी सायलीबरोबर पूजेला जाऊन मग ऑफिसला जाणार असल्याचे कल्पनाला सांगतो. शेवटी अर्जुन पूजा करायला सायली बरोबर जातो आणि गुरुजींना स्वतःलाही पूजा करायची विनंती करतो, कारण त्याला सायलीसाठी पूजा करायची असते. गुरुजी तुम्हाला इच्छा असल्यास मी अडवणारा कोण असे म्हणत अर्जुनला अनुमती देतात.
मालिकेच्या पुढील भागात, सायली वडाची पूजा करताना अचानक पाऊस सुरु होतो आणि अर्जुन सायलीचा पावसापासून बचाव करायला तिच्या डोक्यावर केळीचे पान ठेवत तिच्याबरोबर फेरे घेतो.