‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे राज हंचनाळे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत राज सागरची भूमिका साकारत असून या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. शिवाय सागर व मुक्ता ही जोडीसुद्धा प्रेक्षकांना विशेष भावत आहे. मालिकेत तापट पण प्रेमळ असा स्वभाव असणारा राज खऱ्या आयुष्यात मात्र त्याच्या भूमिकेपेक्षा थोडा वेगळा आहे. या मालिकेआधी राजने अनेक मालिकांमधूनही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Raj Hanchanale Home)
खऱ्या आयुष्यात राजचं लग्न झालं असून तो त्याच्या बायकोसह सुखाचा संसार करताना पाहायला मिळत आहे. राजने खऱ्या आयुष्यात मनीषा ऊर्फ मॉली डेस्वाल हिच्याशी २०१९ मध्ये लग्न केलं. दोघंही २०१३ पासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मिडियावरही राज सक्रिय असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियावर नेहमीच अनेक पोस्ट शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच राजने शेअर केलेल्या सोशल मीडियामधील पोस्टमध्ये त्याच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
राजचं नवं घर हे ठाण्यात आहे. अतिशय नीटनेटकं असं त्याच सुंदर व आलिशान घर या व्हिडीओमार्फत पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याच्या बेडरुममध्ये असलेलं पुस्तकांचा रकानाही लक्षवेधी आहे. तसेच प्रशस्त हॉल आणि त्यामध्ये भिंतीवर असलेल्या पेंटीग्स लक्षवेधी आहेत. अर्थात या सर्व पेंटीग्स राजची पत्नी मॉली हिने काढलेले आहेत. राजची पत्नी ही अभिनयक्षेत्रात कार्यरत नसून ती चित्रकार आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या हटके पेंटीग्स शेअर करताना दिसते.
याशिवाय राजच्या घरातील लक्षवेधी जागा म्हणजे त्याची बाल्कनी. राज व त्याच्या पत्नीने सर्वाधिक फोटो मनी प्लॉंटने सजवलेल्या बाल्कनीमध्ये काढले आहेत. त्याच्या घरातील छान बाल्कनी व घरातील सुंदर फ्रेम्सने लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय दोघेही त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून एकमेकांसाठी वेळात वेळ काढत क्वालिटी टाइम शेअर करताना दिसतात.