बॉलिवूड अभिनेत्री व शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा ही ससध्या तिच्या झहीर इक्बालबरोबरच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनाक्षी तिच्या आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. सोनाक्षी व झहीर त्यांच्या लग्नाने आनंदी असले तरी त्यांच्या लग्नाने सिन्हा कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. नुकतंच शत्रुघ्न सिन्हा व लव सिन्हा यांना सोनाक्षीच्या लग्नावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा दोघांनीही प्रतिक्रिया देण्यावर मौन बाळगले.
अशातच सिन्हा कुटुंबीय सोशल मीडियावरही एकमेकांना फॉलो करत नसल्याचे समोर येत आहे. सोनाक्षी सिन्हाची आई पुनम सिन्हा या इन्स्टाग्रामवर सक्रिय असून त्या इन्स्टाग्रामवर फक्त सहा लोकांना फॉलो करतात. पण ती तिची मुलगी सोनाक्षीला फॉलो करत नाही. कारण सोनाक्षी आणि तिच्या आईचे खूप चांगले संबंध आहेत आणि अलीकडेच तिने हीरामंडीच्या प्रीमियरलादेखील हजेरी लावली होती.
याशिवाय सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाही सोनाक्षीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही. सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्रामवर ४०० लोकांना फॉलो करते, ज्यात तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि दुसरा भाऊ कुश सिन्हा यांचा समावेश आहे, परंतु सोनाक्षी तिची आई पूनम सिन्हा आणि लव सिन्हा यांनाही फॉलो करत नाही. तेव्हापासून सोशल मीडियावर सोनाक्षीच्या कुटुंबात काही ठीक नसल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा – सहा महिन्यांची झाली सई लोकूरची लेक, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “मला तुझी आई म्हणून…”
लग्नाच्या बातम्यांदरम्यान शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीवर नाराज असल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. पण पहलाज निहलानी यांनी म्हटले आहे की, “तसे अजिबात नाही. ते जास्त काळ मुलीवर रागावू शकत नाही आणि सोनाक्षीबरोबर तर नक्कीच नाही. त्यामुळे ते लेकीच्या लग्नाला नक्कीच जातील”. दरम्यान, येत्या १९ जूनला सोनाक्षी व झहीर यांचा संगीत सोहळा आहे, तर २२ जूनला त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर २३ जूनच्या संध्याकाळी दोघेही शिल्पा शेट्टीच्या ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंटमध्ये दोघे रिसेप्शन पार्टी देणार आहेत.