शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला शिकवीन…’मधील अक्षराचं असं आहे सासरकडचं घर, सासूबाईंबरोबर मिळून केली घराची सजावट, स्वच्छतेने वेधलं लक्ष, Inside Video समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2024 | 5:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shivani Rangole Home

'तुला शिकवीन…'मधील अक्षराचं असं आहे सासरकडचं घर, सासूबाईंबरोबर मिळून केली घराची सजावट, स्वच्छतेने वेधलं लक्ष, Inside Video समोर

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली. शिवानी या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारताना दिसत आहे. अक्षरा या भूमिकेमुळे शिवानीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्यात बहरणार प्रेम पाहणं रंजक ठरत आहे. सोशल मीडियावरही शिवानी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत असते. शिवानी मालिकेबरोबरच खऱ्या आयुष्यामुळेही चर्चेत असते. (Shivani Rangole Home)

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना ओळखले जाते. त्या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. दोघांच्या शाही लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. लग्नानंतर शिवानी कुलकर्णी यांच्या घरात रमलेली दिसली. शिवानीचा नवरा विराजस व सासू मृणाल कुलकर्णी या सिनेविश्वात कार्यरत आहेत. कुलकर्णी यांच्या घरी आल्यानंतर शिवानीचे बरेच लाड होताना पाहायला मिळतात. नेहमीच ती नवऱ्याबरोबर व सासूबरोबरचे अनेक फोटो शेअर करताना दिसते.

आणखी वाचा – आई आयसीयुमध्ये असल्यामुळे अनिरुद्ध वेडापिसा, संजना मात्र प्रॉपर्टी नावावर करण्याच्या घाईत, सासूच्या निधनाची वाट पाहत आहे आणि…

कुलकर्णी यांच्या घरी आल्यानंतर त्यांची सून म्हणजेच शिवानीने त्यांच्या मुंबईतील घराची सजावट केली आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमात शिवानीच्या सासरच्या घराची झलक पाहायला मिळाली. मृणाल कुलकर्णी यांच्या घराची सजावट त्यांनी स्वतः व त्यांच्या सूनेने अर्थात शिवानीने केली आहे. शिवानीने तिचं हे सासरचं घर उत्तमरीत्या सजवलं आहे. नितळ पांढऱ्या रंगाच्या भिंती त्याला साजेसं फर्निचर, खुप सुंदर अशी वस्तूंची मांडणी या घरात पाहायला मिळत आहे. सगळ्या गुणांनी साजेसं असं घर तिने सजवलं आहे. याशिवाय शिवानीच्या नवऱ्याने जमवलेल्या बाहुल्या, खेळणी तिने जपून ठेवली आहेत. शिवानीच मॉड्युलर किचनही खूप आकर्षक आहे.

आणखी वाचा – प्रेमात पडल्यानंतर धर्मही पाहिला नाही, द्वेष, त्रासही झाला तरीही…; वैवाहिक आयुष्यामध्ये आता कोणत्या परिस्थितीत आहेत ‘हे’ कलाकार

शिवानीच्या या घरात अजून एक गोष्ट सगळ्यांना आकर्षित करेल ती म्हणजे पुस्तकं. सासरे वकिल, नवरा व सासू कलाकार असल्यामुळे सगळ्यांसाठीच पुस्तक म्हणजे एक प्रकारे खजिनाच आहे. त्यामुळे त्यांच्या घरात पुस्तकांसाठी विशेष जागा केली आहे. इतकंच नव्हे तर पुस्तक वाचण्यासाठी त्या खोलीत बसण्याची सोयही केली आहे.

Tags: marathi actressshivani rangole and virajas kulkarniShivani Rangole HomeTula shikvin Changalach Dhada
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sonakshi Sinha's mother Poonam Sinha and brother Luv Sinha do not follow each other on social media.

धर्म की नात्याच्या विरोधात कुटुंबिय?, झहीर इक्बालशी लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हाच्या घरातील मंडळींची नाराजी, आईचा मोठा निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.