बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच ती बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी ही धर्माने हिंदू असून जहीर मुसलमान आहे. दोघांचे धर्म वेगळे आहेत तरीही लग्न करत आहेत यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. सोनाक्षीच्या लग्नाला आई-वडिलांचा पाठिंबा असण्याबाबत अनेक अंदाजदेखील बांधले जात आहेत. मात्र प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असं म्हणतात हे खरं आहे. त्यामुळे सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन सोनाक्षी व जहीर लग्न करणार आहेत. अशाप्रकारे बॉलिवूडमध्ये अजूनही काही जोड्या आहेत ज्यांनी धर्माची बंधनं झुगारून लग्न केले आहे. (bollywood intercast marriage )
मोहसीन खान हे पाकिस्तानी क्रिकेटर होते. तसेच त्यांनी काही बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी अभिनेत्री रिना रॉय यांच्याबरोबर लग्न केले. त्यांचे नाते खूपच चर्चेत राहिले होते. दोघांनाही अनेक समस्यांचाही सामना करावा लागला. १९८३ साली ते लग्नबंधनात अडकले. मात्र काही कारणांमुळे त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं लग्नदेखील अधिक चर्चेत राहिले. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिलानेदेखील मोहसीन अख्तरबरोबर लग्नगाठ बांधली. ३ मार्च २०१६ रोजी ती मोहसीनबरोबर लग्नबंधनात अडकली. उर्मिला मराठी असून मोहसीन हा काश्मिरी मुसलमान आहे. तसेच उर्मिला ही मोहसीनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

बॉलीवूड दिग्दर्शिका, नृत्यदिग्दर्शिका व निर्माती फराह खानने देखील वेगळं धर्म असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न केले. फराह शिरीष कुंदेरबरोबर लग्नबंधनात अडकली. ‘मै हू ना’ या चित्रपटाच्या सेटवर शिरीष व फराहची भेट झाली. तेव्हा दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. शिरीष हा फराहपेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. लग्नाआधी त्यांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

रितेश देशमुख व जेनीलिया डिसुजा ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. रितेश हा मराठी असून जेनीलिया ही मंगलोरीयन कॅथलिक आहे. २०१२ साली दोघंही लग्नबंधनात अडकले.

मलाइका अरोरा व अरबाज खान हीदेखील मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी होती. १९९३ साली त्यांनी एकत्र कॉफीची जाहिरात हेली होती. त्यावेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी लग्नदेखील केले. मात्र काही कारणांमुळे ते वेगळे झाले.
