‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे अहिल्यादेवी कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेल्या असतात तेव्हा गुरुजी आदित्यची काळजी करु नकोस त्याच्याबरोबर असणारी मुलगी ही त्याचं संकट कवच आहे आणि ती वेळोवेळी त्याची काळजी घेईल आणि त्याला सुखरूप ठेवेल यावर विश्वास ठेव. अहिल्यादेवींना हे सगळं ऐकून खूप बरं वाटतं. त्यानंतर इकडे आदित्य व पारू फिरायला गेलेले असताना रस्ता क्रॉस करताना अचानक गाडी मध्ये येते मात्र पारू आदित्यला जोरात खेचून घेते आणि ओरडू लागते की, तुम्हाला मी केव्हापासून सांगत आहे रस्ता नीट क्रॉस करा. (Paaru Serial Update)
यावर आदित्य सांगतो की, मी कधीच रस्ता क्रॉस केला नाही आहे. मला नाही माहिती रस्ता कसा क्रॉस करतात. यावर पारू शांत होते आणि न चिडता आदित्यला म्हणते की, मला किती काळजी आहे उद्या जाऊन मला अहिल्यादेवींनी विचारलं असतं तर मी काय उत्तर दिलं असतं?, हे पाहून आदित्य म्हणतो की, तू आधी शांत हो मला काही झालेलं नाही आणि माझी काळजी घ्यायला तू आहेसच की. तर इकडे दामिनी व दिशा हे आदित्य खोलीत नसल्याची खात्री करून नवीन प्लॅन आखतात आणि दामिनी अहिल्यादेवींना फोन करून सांगते की आपला आदित्य त्या पारूबरोबर पळून गेला आहे आता आपण बाकी सगळ्यांना काय सांगणार की, आपला आदित्य किर्लोस्कर कंपनीचा सीईओ एका मोलकरणी बरोबर पळून गेला आहे.
हे ऐकून अहिल्या देवींचाही पारा चढतो. अहिल्यादेवी म्हणतात दामिनी तू काय बोलतेस हे तुला कळतंय का?, यावर दामिनी हो असं म्हणत आदित्य सकाळपासून त्याच्या खोलीत नाही आणि पारूसुद्धा नाही, असं सांगते. हे ऐकून अहिल्यादेवींना अजूनच राग येतो फोन ठेवल्यावर त्या म्हणतात की, मी उगीचच त्या पारूवर विश्वास ठेवला. अहिल्यादेवी पुन्हा देवदर्शनावरून परततात त्यावेळेला त्या थेट आदित्यच्या खोलीत जातात आणि पाहतात तर तिथे आदित्य झोपलेला असतो. दामिनी व दिशाला खूप मोठा धक्का बसतो की, इथं आदित्य कसा आला. यावर अहिल्यादेवी दामिनीला ऐकवतात आणि त्याचबरोबर दिशाला ही सांगतात की, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे काय बोलायचं हे तू आधी समजून घे, यावर दिशा सॉरी म्हणत तिथून निघून जाते. त्यानंतर आदित्य स्वतः उठतो आणि अहिल्यादेवींना सॉरी म्हणत सांगतो की, मी खरंच इथे नव्हतो पण यात पारूची काही चूक नाहीये. मीच तिला सांगितलं होतं की, मला इथून कुठेतरी बाहेर घेऊन चल, मला घरात राहून बोर होत आहे. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींना अजूनच राग येतो. अहिल्या देवी सांगतात हे शेवटचं खोटं असेल जे तू माझ्यापासून लपवून ठेवलेस यापुढे असलं काहीही चालणार नाही. त्यानंतर इकडे गणीने मारुतीला सगळी हकीगत सांगितलेली असते आणि दामिनीने त्याला का मारले हे सुद्धा सांगितलेलं असतं.
ज्यावेळेला पारू पुन्हा घरी परतते तेव्हा मारुती पारुला खूप ओरडतो मात्र त्याच वेळेला आदित्य तिथे येतो आणि तिथे येतो आणि मारुतीची समजूत काढतो. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, दिशा अहिल्यादेवींना एक लिंक पाठवते आणि सांगते की, आपल्या ऍड शूटची ती लिंक आहे ती तुम्ही बघा. अहिल्यादेवी ती ऍड शूटची लिंक पाहायला लागतात तितक्यात तिथं आदित्य व प्रीतम येतात आता अहिल्यादेवींना ती लिंक पाहून कळालं असणार की पारू व आदित्य त्या लग्नाला बसले होते याचा ते विचार करतात. मालिकेत आता पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.