मालिकाविश्वात काम करत असताना अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून ही कलाकार मंडळी नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत सहकलाकारांसह धमाल मस्ती करताना दिसतात. कलाकारांच्या या रील व्हिडीओला चाहतेमंडळी भरभरुन प्रतिसादही देताना दिसतात. अशातच ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकार मंडळी त्यांच्या व्यस्त श्येडुलमधून नेहमीच काही ना काही शेअर करताना दिसतात. (Navri Mile Hitlerla cast video)
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. मालिकेत एजे व लीला यांची अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. एकमेकांच्या पंसतीविना एजे व लीला यांचा लग्नसमारंभ पारही पडलेला पहायला मिळत आहे. एजे व लीला यांव्यतिरिक्त मालिकेत कायमच चर्चेत असतात त्या म्हणजे एजेंच्या सूना. एजेंच्या सूनांभोवतीही मालिकेचं कथानक फिरताना पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकात असलेला किचनमधील सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री शर्मिला शिंदे म्हणजेच दुर्गा हिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शर्मिला ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती दुर्गा जहागिरदार ही भूमिका साकारत आहे. शर्मिला ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच किचनमधील एक व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील स्वयंपाक घराची झलक पाहायला मिळत आहे. मालिकेत दिसणाऱ्या या सुंदर स्वयपांक घरासाठी पडद्यामागच्या कलाकारांची खूप मेहनत असते.
एजेंच्या या सूनेने चक्क किचनवर ताबा मिळवला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दुर्गा म्हणजेच शर्मिला कांदाभजी बनवताना दिसत आहे. कांदाभजीचा बेत केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत, “लेखकांनो तुम्ही जेवण बनवायचा सीन लिहा मात्र आम्ही प्रत्यक्षात जेवण बनवतोय”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.