‘पारू’ या मालिकेत सध्या एक रंजक ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे पारू आदित्यला घेऊन घराबाहेर पडलेली असते तर अहिल्यादेवी व श्रीकांत हे कुलदेवतेच्या दर्शनाला निघालेले असतात. पारू व आदित्य नेमके कुठे गेले आहेत हे मात्र घरात कुणालाही माहीत नसतं. त्यामुळे दामिनीचा पारा फारच चढलेला असतो. दामिनी एका दिवसासाठी का होईना दामिनी देवी किर्लोस्कर म्हणून घरात वावरत असते आणि इतरांना आदेश सोडत असते. मात्र पारू व आदित्य घरात नाही आहेत, हे कळल्यावर तिचा संताप होतो. त्यामुळे ती गनीला विचारते मात्र गनीला याबद्दल काहीच माहिती नसतं आणि तो सांगत असतो की, मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. (Paaru Serial Update)
तायडी आणि आदित्य सर कुठे गेलेत मला खरंच माहीत नाही, मात्र दामिनीला गनी खोटं बोलतो असं वाटतं म्हणून ती त्याला बेदम मारते. त्यावेळेला सावित्रीमध्ये येते आणि त्याची सुटका करते. तर इकडे पारू आदित्य फिरत असतात तेव्हा ते एका गार्डनमध्येदेखील जातात गार्डनमध्ये फिरत असताना त्यांना कपल समजून त्यांच्या पाठीत पोलीसही लागतात मात्र त्याच वेळेला पारूने झाडावरचे फुल तोडलेलं असतं म्हणून तिला असं वाटतं की, आपण फुल तोडलं म्हणून पोलीस आले आहेत. मात्र पोलीस इथे आल्यावर वेगळच काहीतरी बोलतात आणि म्हणतात की तुम्ही चांगल्या घरातले दिसत आहात पण तुम्ही या गार्डनमध्ये असे लपून छपून का फिरत आहात?, पोलीस त्यांच्यावर आरोप करत असतानाच दोघही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात.
तितक्यात आणखी एक पोलीस येतात आणि आदित्य व पारूला पाहून म्हणतात की, हे चित्रपटात काम करणारे हिरो आहेत. आपण पोलीस चौकीत बसूनच यांचं लाईव्ह लग्न पाहिलं होतं, हे ऐकल्यावर त्यांना आदित्य व पारूचा चेहरा आठवतो आणि त्यानंतर ते त्यांना शुभेच्छा देत सोडून देतात. मात्र पारू आता आदित्यमध्ये अधिक गुंतत चाललेली पाहायला मिळते. पारू व आदित्य चालत असतात तेव्हा पारू म्हणते की, मी तुम्हाला मनापासून माझे पती मानल आहे. तुम्हाला याबद्दल काही वाटो किंवा न वाटो पण माझं हे मत कधीच बदलणार नाही.
लोकं काय म्हणतील याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. आपण सात फेरे घेतले आहेत. सात वचन घेतली आहेत आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचनही दिलं आहे. हे सर्व माझ्यासाठी खूप मोलाच आहे, असं म्हणत तिच्या डोळ्यातून पाणी येतं. आता पारू-आदित्य वरील नात्याची कबुली देणार का?, आदित्य या सगळ्या गोष्टींना कसं सामोर जाणार?, हे सगळं पाहणं मालिकेत रंजक ठरेल.