शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुणाकडे शरीरसुखाची मागणी तर कुणाला वाईट स्पर्श, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट अनुभव, धक्कादायक सत्य समोर

Saurabh Moreby Saurabh More
जून 15, 2024 | 3:19 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Divya Tripathi, Kishwar Merchant, Shivaya Pathania, Jasmin Bhasin, Aradhana Sharma and Shilpa Shinde had a bad experience on the casting couch.

कुणाकडे शरीरसुखाची मागणी तर कुणाला वाईट स्पर्श, 'या' लोकप्रिय अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट अनुभव, धक्कादायक सत्य समोर

चंदेरी दुनियेच्या झगमगत्या विश्वातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काउच.  मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट आउभाव आला आहे. पूर्वी अभिनेत्री याबद्दल घडणाऱ्या प्रसंगांबद्दल व्यक्त होत नव्हत्या. पण आता अभिनेत्री त्यांच्याबाबत घडलेल्या घटना स्वत: सांगतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. तर जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल, ज्यांना कास्टिंग काउचच्या वाईट अनुभवाला सामोऱ्या गेल्या आहेत.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्या ही कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला होता आणि तिला मोठा ब्रेक हवा होता. तेव्हा एका दिग्दर्शकाने तिला त्याच्याबरोबर राहण्यास सांगितले होते.

View this post on Instagram

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्तीची सून व ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेतून् प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मदलासा चक्रवर्तीलाही कास्टिंग काउचचा अनुभव आला होता. ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ती म्हणाली होती की, “आजच्या काळात चूक कोणाचीही होऊ शकते, मग तो मुलगा असो किंवा मुलगी”.

View this post on Instagram

A post shared by ShivyaPathania (@shivyapathania)

टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनने तिच्या कास्टिंग काउचबद्दल असं म्हटलं होतं की, “एक दिग्दर्शक होता ज्याने तिला तिचे कपडे काढण्यास सांगितले होते. यावेळी ती खूप घाबरली होती आणि तिला काय होत आहे हेदेखील समजत नव्हते. मात्र, तिने हे होऊ दिले नाही.”

आणखी वाचा – संकर्षण कऱ्हाडेच्या ‘या’ नाटकाला नाट्यपरिषदेचे तीन पुरस्कार, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “अनेक प्रयोग…”

अभिनेत्री किश्वर मर्चंटही कास्टिंग काउचचा अनुभव आला होता. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “एका अभिनेत्याने तिला काम देण्याच्या बहाण्याने वन नाईट स्टँडबद्दल विचारले होते. जे त्याच्यासाठी खूप भयानक होते. पण तिने  याबद्दल ऐकले नाही, ज्यामुळे त्याला काम मिळण्यात अडचणी येत होत्या”.

अनेक धार्मिक टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री शिव्या पठानिया हिनेही कास्टिंग काउचबद्दल आपला अनुभव सांगितला. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “तिच्याकडे  काम नसताना तिला एका निर्मात्याचा फोन आला आणि त्याने अभिनेत्रीकडे तडजोडीची अट ठेवली.

View this post on Instagram

A post shared by Jasmine Bhasin (@jasminbhasin2806)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री आराधना शर्मादेखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती कास्टिंग डायरेक्टरबरोबर एका भूमिकेची स्क्रिप्ट वाचत होती, तेव्हा तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्यात आला ज्यामुळे ती घाबरली”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात जुने स्पर्धक सहभागी होणार?, कलाकारांच्या पोस्टमुळे चर्चा, उत्सुकता शिगेला

शिल्पा शिंदेने यापूर्वी ‘भाबी जी घर पर हैं’मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारली होती. जवळपास २०० भाग केल्यानंतर तिने हा शो सोडला आणि निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला. मात्र, शिल्पाने फी वाढवण्याची मागणी केल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले होते.

Tags: Divyaentertainment newsJasmine BhasinKishwar MerchantShivaya Pathania
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
alia bhatt deepfake video

अलिया भट्टचा पुन्हा एकदा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, AIचा वापर बघून नेटकरी म्हणाले, “हे खूप भयंकर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.