शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाळूमामांमुळेच कुटुंबावरील संकट टळलं”, बाळूमामा साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला प्रसंग, आली प्रचिती

Saurabh Moreby Saurabh More
जून 13, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Balumamachya Navan Changbhala fame Prakash Dhotre shared experiences

"बाळूमामांमुळेच कुटुंबावरील संकट टळलं", बाळूमामा साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला प्रसंग, आली प्रचिती

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अल्पावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा असून अनेक प्रेक्षक ही मालिका आवडीने पाहत आहेत. नुकताच या मालिकेचा नवीन अध्याय सुरु झाला आणि या नवीन अध्यायात बाळूमामांच्या भूमिकेत अभिनेते प्रकाश धोत्रे यांनी बाळूमामांची भूमिका साकारली.

या मालिकेत गेले साडे पाच वर्षांहून अधिक काळ बाळूमामांच्या भूमिकेत अभिनेता सुमीत पुसावळे पाहायला मिळत होता. त्यानंतर प्रकाश धोत्रे बाळूमामांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नुकतेच या मालिकेचे ८०० भाग पूर्ण झाले आणि याचनिमित्ताने ‘इट्स मज्जा’ने प्रकाश धोत्रेंशी संवाद साधला, यावेळी त्यांनी त्यांना आलेल्या अनुभवाविषयी सांगितले.  

या अनुभवाचे कथन करताना त्यांनी असं म्हटलं की, “मी आता आदमापूरला जेव्हा गेलो होतो. तेव्हा साहजिकच मास्क लावून गेलो होतो. आणि मला विशेष व्यवस्था करून देवदर्शन करणे आवडत नाही. तर दर्शन घेत असताना प्रचंड गर्दी होती. पण त्या परिसरात मला बाळूमामा म्हणून अनेकजण ओळखतात. तेव्हा एक गृहस्थ होते त्यांना कदाचित बोलता येत नव्हते. तर ते जवळ आले आणि त्यांनी माझे हात हातात घेतले आणि  ते काहीही बोलत नव्हते. त्यांच्या डोळयांतून फक्त पाणी वाहत होते. तर त्यांनी त्यांच्या अगदी जुन्या मोबाईलमध्ये फक्त माझाच फोटो काढला”.

आणखी वाचा – अक्षरा-अधिपतीमध्ये रोमान्स, बायकोसाठी खास कविताही केली तयार, दोघांमध्ये वाढती जवळीक पाहून भूवनेश्वरी मोठा डाव खेळणार

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “त्यानंतर मी दर्शनच्या रांगेत उभा  असताना आणखी एक गृहस्थ आले आणि त्यांनी माझ्याकडे बघून मला बाळूमामा असं म्हटलं. यावर मी त्यांना “नाही मी बाळूमामा नाही. मी फक्त त्यांची भूमिका करतो” असं म्हटलं. यावर त्यांनी असं म्हटलं की, “आज मामांचे दर्शन माझी घेण्याची इच्छा होती आणि मनापासून असं वाटत होते की, तुमची भेट व्हावी आणि योगायोगाने तुम्हीदेखील भेटलात”.   

आणखी वाचा – नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची वर्णी, महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार    

दरम्यान, प्रकाश धोत्रे यापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत पाहायला मिळाले होते. या मालिकेत त्यांनी लतिकाच्या सासऱ्यांची भूमिका म्हणजेच आप्पा जहागीरदार साकारले होते. त्यांनी आजवर अनेक चित्रपट तसेच अनेक मालिकांमधून काम केलं आहे. याशिवाय बऱ्याच नाटकांमध्येही प्रकाश धोत्रे झळकले आहेत.

Tags: Balumamachya Navan Changbhalamarathi entertainment newsPrakash Dhotre
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Netra and Indrani prepared a new plan against Rupali to get Astiktyar

अस्तिकट्यार मिळवण्यासाठी नेत्रा-इंद्राणीचा रुपालीविरुद्ध नवीन प्लॅन, प्लॅनमध्ये रुपाली स्वत: फसणार? की राजाध्यक्षांनाच फसवणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.