जी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नुकताच रुपालीने राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश केला आहे. रुपाली तिला काही आठवत नसल्याचे नाटक करून राजाध्यक्षांच्या कुटुंबात प्रवेश करत आहे. कालच्या भागात इंद्राणी व केतकी काकू यांना स्वयंपाकघरात कुणी तरी असल्याचे जाणवले. त्यामुळे आतमध्ये कोण आहे ते बघण्यासाठी त्या जातात. तर तिथे रुपाली जेवण करत असल्याचे त्यांना दिसते. तिला जेवण करताना बघून दोघींना आश्चर्य वाटते.
यानंतर रुपाली केतकी काकूला घरातील कोणताच बदल मला आवडला नसला तरी तुझ्यात झालेला एक बदल मला आवडला तो म्हणजे तू दारू सोडली हा बदल. केदार अचानक गायब झाल्यानंतर तू दारू प्यायला लागलीस. पण आता तू दारु पित नाहीस हे बघून छान वाटलं असं ती म्हणते. यादरम्यान डॉक्टर नेत्रा-अद्वैतकडे रुपालीविषयीची विचारपूसही करतात. पुढे दवाखान्यातुन बाहेर आल्यानंतर अद्वैत मला तुझ्यासारखी मुलगीच झाली पाहिजे आणि राजाध्यक्षांच्या घरात लक्ष्मी आली पाहिजे असं म्हणतो.
इतक्यात त्यांना कावळ्यांचा आवाज येतो. झाडावर एकही कावळा नसताना त्यांना हा आवाज का येत आहे म्हणून त्यांना चिंता वाटते. त्यानंतर नेत्रा-अद्वैत शेखर व इंद्राणी यांना ही खुशखबर देतात. त्यामुळे दोघेही आनंदी होतात. इतक्यात केतकी काकू तिथे येते आणि तिलाही आनंदाची बातमी दिली जाते.
आणखी वाचा – मेष, तूळ राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस महत्त्वाचा, करिअरमध्ये मिळणार यश आणि व्यवसायात लाभ
यादरम्यान, आजच्या भागात नेत्राला विरोचकाचा वध का झाला नाही? याबद्दल अद्वैतला बोलते. यावेळी तिला जाणवते, की श्लोकाच्या नियमाप्रमाणे दोन मस्तिष्क असलेला माणूस विरोचकाचा वध करु शकत नाही आणि नेत्राने विरोचकाचा वध केला तेव्हा ती गरोदर होती. याबद्दलचा एक प्रोमोही नुकताच शेअर करण्यात आला असून हे प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.