रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूरने सोडली होती दारू, पण शूट पूर्ण होण्यापूर्वीच नशा करु लागला अभिनेता, पार्टीतील फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 10, 2024 | 5:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ranbir Kapoor holding drink glass

'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरने सोडली होती दारू, पण शूट पूर्ण होण्यापूर्वीच नशा करु लागला अभिनेता, पार्टीतील फोटो समोर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून अभिनेता चित्रीकरणामध्ये खूपच व्यस्त आहे. अभिनेता त्याच्या भूमिकेसाठी खूपच मेहनत घेत आहे. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी त्याने दारू व मांसाहार सोडल्याचे सांगितले होते. अशातच आता रणबीरचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे.

नुकताच राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगची भव्य पार्टी झाली होती.  या पार्टीमध्ये रणबीरनेही सहभाग घेतला होता आणि याच पार्टीतला त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रणबीरने हातात एक ग्लास धरला आहे. ज्यामध्ये दारु असल्याचे भासत आहे.

Ranbir kapoor ,ayaan mukherji shanaya kapoor
and SRK daughter suhana khan #ranbirkapoor pic.twitter.com/RY1FtFsvYS

— raj (@rajkbest) June 3, 2024

या फोटोमध्ये रणबीर कपूरने पांढऱ्या रंगाचे जॅकेट आणि ट्राउझर्स परिधान केले असल्याचे दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये अभिनेता अंबानींच्या पार्टीत पाहुण्यांशी बोलताना दिसत आहे. तसेच तो शनाया कपूरच्या शेजारी उभा असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – ‘खुलता कळी खुलेना’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखचं सहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री

या फोटोमध्ये रणबीरच्या हातात असलेला ग्लास हा नक्की दारुचा आहे?, की त्यात आणखी काही वेगळे पेय आहे? याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. मात्र रणबीरच्या या फोटोने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे तो टीकेचा धनी झाला आहे.

आणखी वाचा – आधी तीन वेळा आयव्हीएफ, गंभीर आजार आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक झाली सर्जरी, कॅमेऱ्सामोरच रुग्णालयात ढसाढसा रडली अन्…

रणबीरच्या हातातील पेय हे दारु असल्याचे समजून अनेकजण त्याच्यावर नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ या लोकप्रिय चित्रपटानंतर अभिनेता त्याच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.      

Tags: bollywood actorBollywood entertainment newsranbir kapoor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Hruta Durgule New webseries

हिंदी वेबसीरिजमध्ये ऋता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केला टीझर, हिंदीतील बड्या कलाकारांबरोबर करणार काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.