शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वैष्णोदेवी दहशतवादी हल्याप्रकरणी मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी व्यक्त केला राग, सोशल मीडियावर भयावह दृश्य शेअर करत म्हणाले…

Saurabh Moreby Saurabh More
जून 10, 2024 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prathamesh Laghate and Mugdha Vaishampayan expressed their anger on Vaishnodevi terror attack

वैष्णोदेवी दहशतवादी हल्याप्रकरणी मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी व्यक्त केला राग, सोशल मीडियावर भयावह दृश्य शेअर करत म्हणाले...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (९ जून) रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असल्यामुळे एकीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असतानाच लगेच आज देशवासीयांसाठी एक दु:खद बातमी समोर येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. दर्शनासाठी वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बसवर रविवारी हा हल्ला झाला. ९ जूनला झालेल्या या हल्यात १० जण ठार झाले आहेत. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी या तिर्थस्थळावरुन परत येत असलेल्या बसवर रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. या दुर्देवी घटनेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले आहेत. पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ ही घटना घडली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली अन् स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियासह सर्वच प्रसार माध्यमांमध्ये याबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी आपला राग व द्वेष व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “मालिकांच्या चढाओढीमुळे शीर्षकगीतांचा बळी…’’, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “एक एक सेकंदही…

याबद्दल लोकप्रिय मराठी गायक गायिका प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांनीही आपला राग व्यक्त केला आहे. वैष्णोदेवी दहशतवादी हल्ला प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत  मुग्धा व प्रथमेश यांनी राग व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून “All Eyes On Rafah”च्या संदर्भातली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. याच पोस्टशी संबंधित “All Eyes On Vaishnodevi Attcak” अशी पोस्ट मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत याबद्दल राग व्यक्त केला आहे.  

 

आणखी वाचा – Video : असं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे नवीन घर, घरात स्वामी समर्थ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, नावाच्या अनोख्या पाटीनेही वेधलं लक्ष

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील भाविकांना घेऊन ही बस शिवखोडी मंदिरापासून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात होती. याचवेळी पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केला. गोळीबारानंतर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ५३ आसनी ही बस खोल दरीत कोसळली.

Tags: mugdha vaishampayanprathamesh laghateVaishnodevi Terror Attack Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Savita Malpekar's mother passed away and after her tenth ritual she returned to the Shiva serial set

"नुकतीच माझी आई गेली...", सविता मालपेकरांच्या आईचं निधन, तरीही शूट करत आहेत अन्...; म्हणाल्या, "दुःख आहेच पण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.