‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत रुपालीने नाटक करून पुन्हा एकदा राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे विरोचक पुन्हा राजाध्यक्षांच्या घरात आल्याने सर्वांनाच भीती वाटत आहे. रुपालीद्वारे विरोचकक पुन्हा घरात आल्याने सर्वच जण चिंतेत पडले आहेत. अशातच मालिकेच्या कालच्या भागात रुपाली तिने केलेल्या कृत्याची अद्वैतकडे माफी मागते. त्याच्या पाया पडत ती त्याला माफ करण्यासाठी विनवणी करते. मग नेत्रा रुपालीला बाजूला सारत त्याला तिच्याकडे खेचून घेते.
यानंतर रुपाली “मी एक सून म्हणून, एक आई म्हणून हरले आहे” असं रडत रडत म्हणते. तसेच “तुम्ही सगळे माझ्याशी असे वागत आहात म्हणजे नक्कीच माझ्याकडून काहीतरी मोठी चूक झाली आहे ”असंही म्हणते. मग नेत्रा “आजींना तू मारलं आहेस” असं रुपालीला म्हणते. यानंतरही रुपाली तिला काहीच आठवत असल्याचे नाटक करत “मी सासूबाईंना का मारेन. त्या माझ्या सासू असल्यातरी आईसारख्या होत्या. पण तरी मी घरातल्या कुणाला का मारेन?” असंही म्हणते. यानंतर नेत्रा रुपालीचा हात पकडून तिला तिच्या खोलीबाहेर काढते.
पुढे इंद्राणी श्लोकाचे वाचन करत असताना नेत्रा-अद्वैत तिच्या खोलीत येऊन तिला नेत्रा आई होणार असल्याची खुशखबर सांगतात. यानंतर इंद्राणी हा देवीआईचा शुभाशीर्वाद असल्याचे नेत्राला सांगते. तसेच तिने आता कसलीच चिंता न करता स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे असंही सांगते.
पुढे फाल्गुनी जिन्यावरून उतरत असताना तिचा तोल जातो आणि ती पडते. त्यामुळे तिच्या पाय मुरगळतो. ती पडल्याचे बघताच रुपाली तिला उचलून खोलीत घेऊन जाते आणि तिचा पाय दाबत असते. इतक्यात इंद्राणी हे बघून खोलीत जाते आणि रुपालीला तिच्यापासून लांब करते. पुढे रुपाली सासुबाईंच्या फोटोची साफसफाई करत असताना इंद्राणी लपून तिच्याकडे बघत असते.
आणखी वाचा – तुळ राशीसह ‘या’ ५ राशींसाठी सोमवारचा दिवस फायद्याचा, संपत्तीत होणार भरघोस वाढ, जाणून घ्या…
यानंतर डॉक्टर नेत्राला गरोदरपणात घेतल्या जाणाऱ्या काळजीविषयी सूचना देतात. तसेच तिच्या बाळाची तपासणी ही करतात. त्यामुळे आता मालिकेच्या पुढील भागात इंद्राणीला अस्तिकट्यारचा शोध लागणार का? नेत्रा–अद्वैत यांच्या बाळाचे पुढे काय होणार? रुपाली बदलली आहे की नाही? याबद्दल प्रेक्षकांना पुढील भागात पाहायला मिळेल.