मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर नेत्रा व अद्वैत यांना पोलिस बोलावून घेऊन जातात. यानंतर आजच्या भागात नेत्रा व अद्वैत पोलिसांकडे जात असताना नेत्राला कसलेतरी संकेत मिळतात. यानंतर पोलिस नेत्रा व अद्वैत यांना रुपालीच्या आत्महत्येवरुना चांगलेच सुनावतात. राजाध्यक्षांचे पुण्यात मोठे नाव आहे आणि हे असे प्रकरण होणे त्यांच्यासाठी चांगले नाही. असं पोलिस त्यांना सांगतात. यानंतर रुपाली शुद्धीत आल्यानंतर दिलेल्या जबाबात तिने कुटुंबाचे नाव घेतले तर तक्रार दाखल करावी लागेल असंही म्हणतात.
यानंतर रुपालीही पोलिसांकडे येते. तेव्हा पोलिस “तुम्हाला आत्महत्येसाठी कुणी प्रवृत्त केलं होतं का?, घरी कुणी त्रास देतात का?” असं विचारतात. यावर ती घरात कुणीही मला त्रास देत नाही. घरची सर्व माणसे चांगली आहेत” असं म्हणते. यानंतर रुपाली नेत्रा-अद्वैतबरोबर घरी जाते. तसेच तिने केलेल्या कृत्याबद्दल ती सर्वांची माफीही मागते. नेत्रा-अद्वैतसह सगळच तिचा राग-राग करतात. यानंतर नेत्रा तिच्या सासूकडे बघून रडायला लागते.
आणखी वाचा – शनिवारी तूळ व कर्क या राशींचे भविष्य उजळणार?, शनिदेवाच्या कृपेने होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या…
यादरम्यान, नेत्रा-अद्वैत कशावर विश्वास ठेवावा?, कशावर नाही? हेच कळत नाहीये? असं म्हणतात. तसेच अद्वैत नेत्राला असं म्हणतो की, तू अनेकदा तिला मारूनही विरोचक जीवंत आहे. तर नदीत उडी मारल्याने तिला काहीही होणार नाही. त्यामुळे विरोचकाचा वध काअ झाला नाही हे आपल्याला शोदून काढावंच लागेल असं म्हणते. यानंतर ती देवीआईकडे मला हे काय चाललं आहे ते काहीही कळत नाहीये. त्यामुळे तू वाट दाखव. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर अशी प्रार्थना करते. यानंतर शेखर अद्वैतला अस्तिकट्टयार मिळाली नसल्याचे सांगतो.
यानंतर नेत्रा,अद्वैत शेखर व इंद्राणी हे विरोचक सर्व नाटक करत असल्याचे म्हणतात.तसेच त्यांच्यात अस्तिकट्टयारीचा शोध घेण्याविषयी चर्चा होताना दिसते. तसेच यावेळी नेत्रा तिला पोटातील बाळाचे संकेत आल्याविषयीही सर्वांना सांगते. त्यामुळे नेत्राला येणाऱ्या या संकेतांचा नक्की काय संबंध आहे? रुपाली ही रुपालीच आहे की पुन्हा ती विरोचक म्हणून घरात आली आहे? याबद्दल जाणून घेण्यासाठी आता मालिकेतील आगामी भाग पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.