बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. चंदीगढ एअरपोर्टवर घडलेल्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. सर्व स्तरातून कंगनाबरोबर घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला गेला. मात्र बॉलिवूडमधून कंगनाला कोणीही पाठिंबा देताना दिसले नाही. यावरुन कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत बॉलिवूडकरांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच कंगनाला ज्या महिला कॉन्स्टेबलने कानाखाली मारले तिला सस्पेंडदेखील केले आहे. अशातच आता विशाल ददलानी या संगीतकार व गायकाने या प्रकणात उडी घेतली आहे. (vishal dadlani on kangana ranaut)
कंगनाला एअरपोर्टवर कुलविंदर कौरने कानशिलात लगावली होती. सिक्युरिटी चेकिंग दरम्यान ही घटना झाल्याचे स्वतः कंगनाने सांगितले. तिने असे का केले हे विचारताच तिने पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन करत असल्याचे सांगितले. या कॉन्स्टेबलच्या विरोधात कारवाई झाली असून तिला सस्पेंड केले असल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर विशालने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत विशालने लिहिले आहे की, “मी हिंसेचे समर्थन करत नाही. पण मी त्या महिलेची अवस्था समजू शकतो. मी वचन दिले आहे की मी हिंसेचे कधीही समर्थन करत नाही. पण मी कुलविंदर यांचा राग व गरज समजू शकतो. जर त्यांचा या प्रकणामुळे नोकरी गेली तर मी त्यांना नोकरी देईन. जय हिंद. जय जवान जय किसान”.
पुढे त्याने कॉन्स्टेबलवर टिका करणाऱ्या लोकांनादेखील खडे बोल सुनावत लिहिले आहे की, “जर त्या तुम्हाला असं म्हणाल्या असत्या की तुमची आई १०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर तुम्ही काय केलं असतं?”
विशालच्या या पोस्टवर आता खूप प्रश्न उपस्थित राहिले आहेत. कंगना या सगळ्यावर काय उत्तर देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.