मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती म्हणजे श्वेता शिंदे. अभिनयाबरोबर निर्मितीची धुरा सांभाळणारी श्वेता शिंदेच्या घरात मोठी चोरी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. घरात कुणी नसताना तिच्या घरात काही मोठी चोरी झाली आणि यात तिचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावेळी तिच्या कपाटातले दागिने आणि काही पैशांची चोरी झाली आहे. या घटनेमुळे अभिनेत्रीच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.
अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदे आपल्या कुटुंबासह साताऱ्यातील पिरवाडी येथे राहते. मात्र काही कामानिमित्त ती मुंबईत आली होती. यावेळी घरात कोणीच नव्हतं. त्यामुळे यावेळी घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरांनी ३ जूनच्या रात्री तिच्या घरात चोरी केली. याबद्दल अभिनेत्रीने सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आणि ही तक्रार दाखल केल्यानंतर श्वेता शिंदेने माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ‘Times Now’ला दिलेल्या प्रतिक्रियेत तिने असं म्हटलं की, “३ मे रोजी रात्री माझ्या साताऱ्यातील घरी दरोडा पडला. साधारणत: दहा तोळे सोनं व काही पैसे गेले आहेत. एकूण किती मालमत्ता चोरीला गेली आहे हे माहित नाही. आईच्या जेवढं लक्षात आहे, तेवढं तिनं सांगितलं. नशीब चोरी झाली त्यावेळी ती घरात नव्हती. त्यामुळे तिला कुठलीही दुखापत झाली नाही. आता मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आहे. येथील पोलिस यंत्रणा सशक्त आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व गुन्हेगार व चोर लवकरच पकडले जातील, अशी माझी सकारात्मक भावना आहे”.
आणखी वाचा – साक्षीच्या मोबाईलमधून चैतन्यला महीपतचा नंबर मिळणार का?, यामुळे साक्षीला चैतन्यचा संशय येणार का?
यापुढे तिने असं म्हटलं की, “पोलिसांनी सांगितले की, ते स्वत: यात जातीने लक्ष घालतील. पण मला असं वाटतं की, इथली पोलिस यंत्रणा ही खूपच सशक्त आहे. त्यामुळे मला याबद्दल खूपच आत्मविश्वास आहे की, पोलिस यातून काही तरी निष्कर्ष काढतील. मी एक नागरीक म्हणून माझी जबाबदारी पार पाडली आहे. पण आता ही यंत्रणा कशी काम करते हे आपण बघूच. पण यातून काहीना काही सकारात्मक होईल याबद्दल मला विश्वास आहे”.