शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलगी झाली हो! वरुण धवन व नताशा दलाल झाले आई-बाबा, कुटुंबामध्ये जोरदार सेलिब्रेशन

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2024 | 2:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Varun Dhawan and his wife Natasha Dalal blessed with baby girl good news shared on social media

मुलगी झाली हो! वरुण धवन व नताशा दलाल झाले आई-बाबा, कुटुंबामध्ये जोरदार सेलिब्रेशन

‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘में तेरा हिरो’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘कलंक’, ‘भेडिया’, ‘बवाल’, ‘दिलवाले’, ‘जुडवा २’ अशा अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे वरुण धवन. आपल्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा अभिनेता नुकताच बाबा झाला असून धवन यांच्या मुलीचे आगमन झाले आहे. वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले असून काल (३ जून) रोजी नताशाने बाळाला जन्म दिला. त्यानंतर वरुणचे बाबा व बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी आनंदाची बातमी दिली आहे.

डेव्हिड धवन यांनी बाळाची भेट घेऊन रुग्णालयातून निघताना नताशाने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली. वरुण व नताशा यांना मुलगी झाली आहे, असं डेव्हिड धवन यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्यात वरुण व नताशा यांनी ते आई-बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून शेअर केली होती. वरुणने नताशा व त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

सोशल मीडियावर दोघांनी त्यांचे हटके फोटो पोस्ट करत आम्ही प्रेग्नंट आहोत, आम्हाला तुमच्या प्रेमाची व आशीर्वादाची गरज आहे,” असं लिहिलं होतं. तेव्हापासून त्यांच्या अनेक चाहत्यांना या गुडन्यूजची उत्सुकता लागून राहिली होती आणि अखेर काल वरुण-नताशा यांनी चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

आणखी वाचा – मंगळवारी ‘मिथुन’ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळणार, तर ‘मकर’ राशीच्या लोकांची महत्त्वाची कामे पूर्ण होणार, जाणून घ्या…

२४ जानेवारी २०२१ ला वरुण व नताशा लग्नबंधनात अडकले होते. वरुण व नताशा लहानपणापासूनचे मित्र-मैत्रीण आहेत. लग्नाआधी दोघांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०२१ साली लग्न केलं. आता तीन वर्षांनी दोघे आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे.

आणखी वाचा – “तुम्ही वैश्यवाणी आहात ना?”, ऐश्वर्या नारकरांना चाहत्याने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने थेट सांगितलं त्यांच्या गावाचं नाव, कुठे आहे घर?

दरम्यान, वरुण धवन व नताशा दलाल यांच्या आई-बाबा झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. त्यांचे अनेक चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत.

Tags: bollywood actorBollywood entertainment newsNatasha Dalalvarun dhawan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
Prathamesh Parab's wife Kshitija Ghosalkar shared a special post for his film Hoy Maharaja.

"तब्येत खूपच बरी नसल्यामुळे...", प्रथमेश परबच्या बायकोने पाहिला त्याचा नवा चित्रपट, "अक्षरशः डोळ्यातून पाणी..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.