शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इतके पैसे येतात कुठून?”, इम्रान खानने नवीन घर बांधताच नेटकऱ्याचा प्रश्न, अभिनेता थेट उत्तर देत म्हणाला, “मी चित्रपटांत…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 2, 2024 | 2:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Imran Khan built new house, a netizen asked, From where he is getting money?

“इतके पैसे येतात कुठून?”, इम्रान खानने नवीन घर बांधताच नेटकऱ्याचा प्रश्न, अभिनेता थेट उत्तर देत म्हणाला, “मी चित्रपटांत...”

बॉलिवूड अभिनेता व आमिर खानचा भाचा असलेला इमरान खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब आहे. २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या इमरानने अनेक चित्रपटांत काम केले. नंतर, त्याच्या बऱ्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठं अपयश मिळाले. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कट्टी बट्टी’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर अभिनेता मनोरंजन क्षेत्रात फारसा सक्रिय दिसला नाही.

मनोरंजन सृष्टीत फारसा सक्रिय नसलेला हा अभिनेता त्याच्या खाजगी आयुष्यामुळे मात्र अनेकदा चर्चेत आला आहे. त्याचबरोबर तो सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे त्याने त्याच्या नवीन घराबद्दलचे माहिती दिली आहे. अभिनेत्याने निसर्गाच्या सानिध्यात नवीन घर बांधल्यानंतर सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत त्याच्या घराची झळक दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Imran Khan (@imrankhan)

इम्रान खानने त्याच्या नवीन घराचे काही फोटो शेअर करत एक मोठी पोस्टही लिहिली आहे. यामध्ये त्याने “पहिल्या वर्षी मी तिथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिला, पावसाळ्यात नद्यांचा प्रवाह समजून घेतला आणि तेथील बदलते हवामान पाहिले. यानंतर घराचे स्केच तयार करण्याचे काम सुरू केले. कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल अभियंता यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांनी काँक्रीट स्लॅब लावण्याऐवजी क्लासिक ऑन-साइट पद्धती वापरल्या. या संपूर्ण प्रक्रियेचा मला खूप आनंद झाला. हे घर मी स्वतः बांधल्यामुळे त्याची किंमत आधीच बांधलेल्या व्हिलापेक्षा कमी होती”. असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – सुशांत सिंहच्या मृत्यूच्या चौकशीबाबत बहिणीचं थेट केदारनाथकडे साकडं, साधूंना भेटली, ध्यानधारणाही केली, म्हणाली, “देवाच्या कृपेने…”

या पोस्टखाली त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या नवीन घरानिमित्त कौतुक केले आहे. त्याला कमेंट्समध्ये अनेकांनी अभिनंदन व शूभेच्छाही दिल्या आहेत. मात्र यापैकी एका कमेंटने सर्वनाचे लक्ष वेधले आहे. एका नेटकऱ्याने इम्रानच्या या पोस्टवर “याच्याकडे इतके पैसे कुठून येतात?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर इम्रानने “मी २०००च्या दरम्यान काही चित्रपटांमध्ये काम केले.” असं उत्तर दिलं आहे.    

आणखी वाचा – चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मागितली होती सोनाली कुलकर्णीची माफी, अभिनेत्रीने स्वत:च सांगितले कारण, म्हणाली, “मला त्रास…”

दरम्यान, इम्रानने शेअर केलेल्या त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये असे दिसून येत आहे की, त्याने गेल्या काही वर्षांत स्वतःचे घर बांधले आहे. त्याने सांगितले की त्याला एक आलिशान व्हेकेशन व्हिला बनवायचा नाही तर निसर्गाच्या सानिध्यात एक घर बांधायचे होते जिथून त्याला निसर्गाचे सौंदर्य पाहता येईल.

Tags: bollywood actorBollywood entertainment newsimran khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Rang Majha Vegla fame marathi actor Ashutosh Gokhale talked Ram is only in Ayodhya.

“राम फक्त अयोध्येत...”, ‘रंग माझा वेगळा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे भाष्य, म्हणाला, “इतके वर्षे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.