टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. अलीकडे अभिनेत्री तिच्या दुस-या लग्नातील मतभेदामुळे चर्चेत आली होती. दलजीतने तिचा नवरा निखिल पटेलवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत. एवढेच नाही तर निखिलवर फसवणुकीचे अनेक आरोपही केले. मात्र, आता निखिल पटेल यांनीही दलजीत कौरच्या आरोपांवर आपले मौन सोडले आहे. त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासेही केले. (Dalljiet Kaur Marriage Life)
निखिल पटेल यांनी दलजीत कौरच्या आरोपांना उत्तर असं म्हटलं की, “या वर्षी जानेवारीमध्ये दलजीतने मुलगा जेडेनबरोबर केनिया सोडून भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही वेगळे झालो. आम्हा दोघांना कळले की, आमच्या कुटुंबाचा पाया आमच्या अपेक्षेइतका मजबूत नाही. दलजीतला केनियात राहणे कठीण झाले. दलजीतला केनियातील तिच्या आयुष्याशी जुळवून घेता आले नाही”.
या नात्यावरील मौन सोडत निखिल म्हणाले, “माझ्या कारकिर्दीची आणि भारतातील आयुष्याची आठवण ठेवून दलजीत व आमचे कुटुंब अधिक दूर झाले. आम्हा दोघांच्या संस्कारामुळे अनेक गोष्टी अवघड होत होत्या. माझ्या मुलींची एक आई आहे जी त्यांच्यातील नातेसंबंधांची पर्वा न करता निघून गेली. दलजीतने ज्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी तिने मला आणि तिच्या मुलाच्या शाळेत सांगितले की, तिचे उरलेले सामान घ्यायला फक्त ती केनियाला येणार आहे”.
इतकंच नाही तर निखिल असंही म्हणाला की, “माझ्यासाठी दलजीत केनियाहून भारतात परत जाणं म्हणजे आमचं नातं संपल्यासारखं आहे”. ‘बिग बॉस १३’ फेम दलजीत कौरने गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत केनियास्थित व्यावसायिक निखिल पटेलबरोबर लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर वर्षभरातच दलजीत व निखिलच्या नात्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. गेल्या शनिवारी दलजीतने इन्स्टास्टोरीद्वारे निखिलबरोबर विभक्त झाल्याची पुष्टी केली होती. काही महिन्यांपूर्वी दलजीत व निखिलनेही एकमेकांना अनफॉलो केले.