मनोरंजन क्षेत्रामधील कलाकारांचे आयुष्य हे जितके ग्लॅमरस वाटते, तितकेच ते असतं असं नाही. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळेच चर्चेत राहत असतात. अशाच एक अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी. बेटा, ‘फर्ज, रॉकी’, ‘बॉबी’ आणि ‘लव्ह स्टोरी’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अरुणा इराणी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये आहेत. त्यांनी आजवर ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून त्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या.
दिग्दर्शक कुकू कोहलीबरोबरच्या त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा रंगली होती. त्यांनी अनेक दिवस त्यांचे लग्न सर्वांपासून लपवून ठेवले होते. याशिवाय त्यांनी कधीही आई न होण्याचाही निर्णय घेतला होता. अशातच त्यांनी एका मुलाखतीत त्यांचे लग्न लपवून ठेवण्याबद्दल व मुल न होण्याच्या त्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. याबद्दल त्यांनी असं म्हटलं होतं की, “मी एका विवाहित पुरुषाशी लग्न केल्याचे कोणालाही माहीत नव्हते. त्याच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी काही आजाराने निधन झाले होते असून मी याबद्दल पहिल्यांदाच बोलत आहे”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मला माहित नाही की, मला त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल माहीत नव्हते ही बातमी का पसरवली गेली? त्यांची पत्नी मुलांसह सेटवर येत असे. पण लग्न करण्याचा निर्णय आम्हा दोघांसाठी खूप कठीण होता. या स्त्रिया नेहमी इतर महिला त्यांच्यावर आरोप करतात. पण मी याला जबाबदार नाही, तिचा नवरा आहे. आधी त्याला थांबवा, त्याने असे का केले? याबद्दल त्याला विचारा. मी कुणाचेही घर फोडले नाही. एखाद्या नात्यात तिसरी व्यक्ती कशी येते? याबद्दल त्या माणसाला किंवा स्त्रीलाच माहिती असते”.
यापुढे अरुणा इराणी यांनी मुले न करण्याच्या निर्णयावर त्यांचं मत व्यक्त करताना असं म्हटलं की, “विवाहित पुरुषाशी लग्न करणे सोपे नाही. यामुळे मी कधीच आई झाले नाही आणि हे दु:ख मी सहन करत आहे. मी त्या वेदना झेलत आहे. मला काळजी वाटते हे ठीक आहे, पण माझ्या मुलाने पुढे जाऊन वडील कुठे आहेत? असे विचारले, तर मी त्याला काय उत्तर देऊ? ते (कुकू कोहली) हेही फसतील. समजा माझ्या मुलाला मध्यरात्री काही झाले तर मी कॉल करू शकत नाही. म्हणूनच मला मूल व्हावं असं कधीच वाटले नाही आणि हे दुःख मी माझ्या मुलाला देणार नाही”.